उपवर्गीकरणाच्या मुद्यावर समाजसेविका सुनीता मोहन तूपसौंदर्य यांची मागणी

आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करा

 राजकारण नको, न्याय हवा – 


पी आर न्यूज मिडिया नेटवर्क/ रमेश औताडे 


अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात तातडीने लागू करावे, अशी मागणी समाजसेविका सुनीता मोहन तूपसौंदर्य यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या की, आरक्षणाच्या प्रश्नासाठी दिवंगत नेते बाबासाहेब गोपले यांनी आझाद मैदानावर उपोषण करून मातंग समाजाला स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी सरकारने या प्रश्नावर योग्य न्याय दिला नाही. आता मातंग समाजाला आरक्षणाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवू लागले असून, आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी समाज एकवटला आहे.


सुनीता तूपसौंदर्य यांनी आरोप केला की, काही राजकारणी आणि राज्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नाचे राजकारण करून दलित समाजात जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे समाजातील विविध घटकांनी परस्परांमध्ये मतभेद न करता, उपवर्गीकरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर कशी होईल यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तेलंगणा राज्याने ज्या धर्तीवर उपवर्गीकरणाची प्रक्रिया राबविली आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करावे. त्यामुळे मातंग समाजासह वंचित घटकांतील युवक-युवतींना शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या संधींमध्ये आरक्षणाचा योग्य लाभ मिळू शकेल.

राजकारण्यांनी आणि समाजातील पुढाऱ्यांनी आरक्षणाच्या प्रश्नाचे राजकारण न करता, दलित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहनही समाजसेविका सुनीता मोहन तूपसौंदर्य यांनी केले.

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 
7021777291
रमेश औताडे 

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश