ज्येष्ठांच्या 11 प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करणार - आमदार मंदाताई म्हात्रे


पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 

रमेश औताडे ( प्रतिनिधी )


 बेलापूरच्या आमदार माननीय सौ. मंदाताई म्हात्रे यांना आज फेस्कॉम मुंबई विभाग आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीत ज्येष्ठ नागरिकांच्या 11 प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले. फेस्कॉम मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. विकास साठे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री. अजय माढेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदारांची भेट घेतली. यावेळी श्री. सुरेश पोटे यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. निवेदन स्वीकारताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्येष्ठांच्या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकल्या. ज्येष्ठ हे समाजाचा आधार आहेत असे सांगून, फेस्कॉमच्या 11 मागण्या मुख्यमंत्री यांच्या स्तरावर मांडून त्या लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिले. आमदारांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.  

*आपला स्नेहांकित*  
सुरेश पोटे  
अध्यक्ष - फेस्कॉम मुंबई विभाग
मो. 9322401965

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश