लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन


               नरसिंग सोपान सूर्यवंशी  यांची माहिती

मुंबई / P R NEWS 

भारतीय लहुजी सेना यांच्या वतीने लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी "लेखन प्रेरणा दिन" विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने डॉ. साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि लोकजागृतीच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार असून, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

कार्यक्रमात साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांशी संबंधित मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

भारतीय लहुजी सेनेचे मुंबई विभागीय प्रमुख नरसिंग सोपान सूर्यवंशी यांनी कार्यकर्ते, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लेखन प्रेरणा दिन यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.  विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांनीही डॉ. अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश