सार्वजनिक मोकळ्या जागा जतन करण्याची वेळ

मुंबई / रमेश औताडे 

मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात सार्वजनिक मोकळ्या जागा या नागरिकांच्या आरोग्य, पर्यावरण, सामाजिक संवाद आणि जीवनमानासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भविष्यातील नागरी विकासात या जागांचे संरक्षण, प्रभावी व्यवस्थापन आणि सर्वांसाठी समान उपलब्धता सुनिश्चित करणे ही अत्यावश्यक बाब आहे. अशी माहिती " अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिट्यूट " आणि  " नगर "  या सामाजिक संस्थेने मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईतील प्रत्येक नागरिकासाठी सध्या केवळ १.२८ चौरस मीटर सार्वजनिक मोकळी जागा उपलब्ध असून, राष्ट्रीय नियोजन निकषानुसार ही उपलब्धता १० ते १२ चौरस मीटर प्रति व्यक्ती असणे अपेक्षित आहे. मुंबईची समस्या केवळ मोकळ्या जागांच्या कमतरतेपुरती मर्यादित नसून त्या जागांचे नियोजन, व्यवस्थापन आणि देखभाल यांच्याशीही संबंधित असल्याचे अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिट्यूट  आणि  नगर या सामाजिक संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई विकास आराखडा २०३४ नुसार प्रत्येक नागरिकासाठी ६.१३ चौरस मीटर सार्वजनिक मोकळी जागा नियोजित आहे. मात्र, त्यातील मोठा भाग अद्याप संपादित किंवा विकसित झालेला नसल्यामुळे नियोजित उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नवीन मोकळ्या जागा निर्माण करण्याबरोबरच विद्यमान सार्वजनिक जागांचे सक्षम व्यवस्थापन, समन्वित नियोजन आणि नागरिकांच्या सहभागातून त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे अत्यंत आवश्यक असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

P R NEWS 
Ramesh Autade 7021777291
rameshautade74@gmail.com 



Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश