डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाचा इशारा

मुंबई / रमेश औताडे 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने नवी मुंबई महानगरपालिकेकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नवी मुंबईत उभारण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. याबाबत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी १५ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास पालिका मुख्यालयासमोर पदयात्रा व मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही अनेक वेळा या विषयावर पत्रव्यवहार करण्यात आला असून  अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. असे चंदू पाटील,  दत्तात्रय निंबाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नसल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने योग्य जागा निश्चित करून पुतळा उभारणीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश