महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस मा. खाजाभाई शेख यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले साहेबांचा सत्कार


मुंबई – संविधान बंगला

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 

आज ३१ जुलै २०२६ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले साहेब यांची मुंबई येथील संविधान बंगला येथे अल्पसंख्याक आघाडी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पुष्पहार अर्पण करून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

हा सत्कार अल्पसंख्याक आघाडी, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस मा. खाजाभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यानंतर राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, सामाजिक न्याय, संघटन मजबुती, पक्षविस्तार तसेच जनहिताशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी हाजी वकार खान, मौलाना रशीद अन्सारी, इरफान शेख, कलाम भाई, असलम शेख, मुबीन अलालखान तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

समाजातील सर्व घटकांच्या न्याय, समानता आणि सर्वांगीण विकासासाठी संविधानाच्या मूल्यांनुसार कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

जय भीम! जय संविधान! जय रिपाइं (आठवले)!

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश