मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान

मुंबई / रमेश औताडे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने खेड तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कनेरसर येथील कार्यक्रमात सन्मान करण्यात आला अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व लेखक अशोकराव टाव्हरे यांनी दिली.

खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे,तहसीलदार प्रशांत बेडसे,नितीन सुर्यवंशी,उपअधिक्षक भुमी-अभिलेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबीराची केलेली प्रभावी अंमलबजावणी,कायदा व सुव्यवस्थेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे,महावितरणशी निगडीत समस्येबाबत कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी,सहा.महसुल अधिकारी निलेश घोडके हे  नागरिकांच्या समस्या निवारणार्थ करीत असलेली कार्यवाही यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

प्रशांत बेडसे तहसीलदार खेड, महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी,सहा.महसुल अधिकारी नीलेश घोडके हे वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबीर व वह्या वाटप व सन्मान समारंभास उपस्थित होते,तसेच उपविभागीय अधिकारी (प्रांत), उपविभागीय पोलीस अधिकारी व उपअधिक्षक, भुमी-अभिलेख यांचेवतीने कार्यालय प्रतिनिधींनी सन्मान स्वीकारला असे टाव्हरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोकराव टाव्हरे यांनी केले,तहसीलदार प्रशांत बेडसे,दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन जी.टी.फड यांनी केले,तर आभार सुरेखा टाव्हरे यांनी मानले.

दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे,खेड पंचायत समितीच्या सभापती विद्याताई मोहिते,राजगुरुनगरचे मा.नगराध्यक्ष शिवाजीराव मांदळे,भाजपचे खेड ता.उपाध्यक्ष दिलीपराव माशेरे,कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश