त्वचा, केस आणि एस्थेटिक उपचारांसाठी योग्य तज्ज्ञ शोधणे होणार सोपे
देशभरातील प्रमाणित त्वचारोगतज्ज्ञांना जोडणारे ‘XELIX’ व्यासपीठाचे अनावरण -
मुंबई / रमेश औताडे
त्वचा, केस आणि सौंदर्यविषयक उपचारांसाठी योग्य तज्ज्ञ शोधणे अनेकदा रुग्णांसाठी आव्हानात्मक ठरते. याच गरजेची दखल घेत मुंबईस्थित आकार मेडिकल टेक्नॉलॉजीज लिमिटेडने ‘XELIX’ हे देशातील पहिले क्युरेटेड राष्ट्रीय व्यासपीठ सुरू केले आहे. या व्यासपीठाद्वारे रुग्णांना देशभरातील प्रमाणित त्वचारोगतज्ज्ञ आणि एस्थेटिक तज्ज्ञांशी एका विश्वासार्ह माध्यमातून जोडले जाणार आहे.
कॉस्मेटिक डर्मेटोलॉजी आणि मेडिकल एस्थेटिक्स क्षेत्रात कार्यरत असलेली तसेच एनएसई इमर्ज मंचावर सूचीबद्ध असलेली आकार मेडिकल टेक्नॉलॉजीज ही कंपनी या उपक्रमामागे आहे. XELIX चे उद्दिष्ट हे रुग्णांना सुरक्षित, वैज्ञानिक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्वचा व केसांच्या उपचारांपर्यंत उपलब्ध करून देणे हे आहे.
त्वचारोग आणि एस्थेटिक मेडिसिन क्षेत्रातील अग्रगण्य तज्ज्ञांच्या उपस्थितीत एफएएचए (FAHA) डर्मेटोलॉजी परिषदेत ‘XELIX’चे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. जेरिल बनाइट, डॉ. सय्यद नाझिम, डॉ. व्ही. एस. राठोड आणि डॉ. विजय नागदेव यांच्यासह सौंदर्यविषयक वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
हल्ली मुरुम, त्वचेवरील डाग, केस गळणे, अँटी-एजिंग तसेच विविध कॉस्मेटिक उपचारांची मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र सोशल मीडियावरील माहिती, इन्फ्लुएन्सर्सच्या शिफारशी आणि अप्रमाणित क्लिनिक्सच्या वाढत्या संख्येमुळे पात्र त्वचारोगतज्ज्ञ आणि अपात्र उपचार देणाऱ्या व्यक्तींमध्ये फरक ओळखणे रुग्णांसाठी कठीण होत आहे. अनेक वैद्यकीय संघटनांनी अपात्र व्यक्तींकडून करण्यात येणाऱ्या कॉस्मेटिक उपचारांमुळे त्वचेला भाजणे, संसर्ग होणे, व्रण निर्माण होणे किंवा कायमस्वरूपी त्वचेचे नुकसान होण्याचा धोका असल्याचा इशाराही दिला आहे.
ही गरज ओळखून ‘XELIX’ व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे. या नेटवर्कमध्ये देशभरातील प्रमाणित त्वचारोगतज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील क्लिनिक्सचा समावेश असून, सर्व उपचार वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आणि प्रमाणित क्लिनिकल प्रोटोकॉलनुसार केले जातात. या व्यासपीठावर त्वचारोगतज्ज्ञ, ट्रायकॉलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन आणि एस्थेटिक मेडिसिन तज्ज्ञ उपलब्ध असून, त्वचा, केस आणि सौंदर्यविषयक समस्यांसाठी रुग्णांना योग्य तज्ज्ञांची निवड करता येणार आहे.
रुग्णांना त्यांच्या शहरानुसार किंवा आवश्यक उपचारांच्या आधारे तज्ज्ञ डॉक्टरांचा शोध घेता येईल. डॉक्टरांची माहिती पाहून जवळच्या ‘XELIX’शी संलग्न क्लिनिकमध्ये ऑनलाइन अपॉइंटमेंटही बुक करता येणार आहे. मुरुम, त्वचेवरील पिगमेंटेशन, केस गळणे, स्किन रिज्युवनेशन (Skin Rejuvenation) आणि अँटी-एजिंगसारख्या विविध उपचारांसाठी हे व्यासपीठ रुग्णांचा प्रवास अधिक सोपा आणि विश्वासार्ह बनवणार आहे.
याबाबत त्वचारोगतज्ज्ञ(एम.डी) डॉ. विजय नागदेव म्हणाले, एस्थेटिक उपचार हे वैद्यकीय उपचार असून ते नेहमी पात्र आणि प्रशिक्षित डॉक्टरांकडूनच केले जाणे आवश्यक आहे. अपात्र व्यक्तीकडून उपचार घेतल्यास संसर्ग, त्वचेचे नुकसान आणि उपचारांचे अपुरे परिणाम दिसून येऊ शकतात. ‘XELIX’च्या माध्यमातून रुग्णांना सुरक्षित, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैतिक वैद्यकीय सेवा देणाऱ्या प्रमाणित तज्ज्ञांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल.
प्लास्टिक सर्जन डॉ. व्ही. एस. राठोड म्हणाले, एस्थेटिक मेडिसिन क्षेत्राकडील कल वाढत चालला असून योग्य डॉक्टरांची निवड करणे रुग्णांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. सोशल मीडिया आणि जाहिरातींच्या प्रभावामुळे अनेकदा रुग्णांची दिशाभूल होते. ‘XELIX’ हे व्यासपीठ पात्र त्वचारोगतज्ज्ञ, प्लास्टिक सर्जन आणि एस्थेटिक फिजिशियन यांच्याशी रुग्णांना जोडण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. उपचारांमध्ये पारदर्शकता, गुणवत्तापूर्ण सेवा आणि रुग्णांचा विश्वास जपणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
‘XELIX’च्या माध्यमातून रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा
* देशभरातील प्रशिक्षित आणि प्रमाणित एस्थेटिक तज्ज्ञांशी संपर्क साधण्याची सुविधा.
* जवळचे आणि विश्वासार्ह ‘XELIX’ क्लिनिक सहज शोधता येणे शक्य.
* त्वचा, केस, शरीर आणि सौंदर्यविषयक उपचारांसाठी सर्वसमावेशक सेवा.
* डॉक्टरांची पात्रता आणि अनुभवाची पडताळणी करून योग्य निर्णय घेण्याची संधी.
* सुलभ आणि जलद अपॉइंटमेंट बुकिंग प्रक्रिया.
* सर्व क्लिनिक्समध्ये एकसमान आणि वैज्ञानिक उपचार पद्धती.
आकार मेडिकल टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक डॉ. राहुल सावखंडे म्हणाले, ‘XELIX’ हे केवळ रुग्णांसाठीचे व्यासपीठ नसून त्वचारोगतज्ज्ञ आणि एस्थेटिक फिजिशियन यांच्यासाठीही महत्वाची ठरणार आहे. यामध्ये सहभागी डॉक्टरांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रमाणित उपचार पद्धती, प्रशिक्षण, ज्ञानविनिमय आणि राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल ओळख यांचा लाभ मिळणार आहे.
भारतात एस्थेटिक मेडिसिन क्षेत्राचा वेगाने विस्तार होत असताना रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि उपचारांच्या गुणवत्तेसाठी विश्वासार्ह वैद्यकीय व्यासपीठांची गरज अधिक अधोरेखित होत आहे. सोशल मीडियावरील दिशाभूल करणारी माहिती आणि अप्रमाणित उपचारांच्या पार्श्वभूमीवर ‘XELIX’ हे व्यासपीठ रुग्णांना योग्य आणि सुरक्षित वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
Comments
Post a Comment