अशोक टाव्हरेंच्या प्रेरणादायी कामाचे नेहमीच कौतुक राहील - नितीन गडकरी
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
गेली अनेक वर्षे साहित्य, समाजकार्य आणि पक्षनिष्ठेच्या माध्यमातून अशोकराव टाव्हरे करीत असलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे अस केंद्रीय रस्तेविकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
नितीन गडकरी यांच्या सार्वजनिक कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट या पुस्तकांचे लेखन टाव्हरे यांनी केले असून गेली सात वर्षामध्ये शासकीय कार्यालये, ग्रंथालये, शाळा,पदाधिकारी, अधिकारी यांना पुस्तकांचे वितरण केले आहे.गडकरी यांचा २७ मे रोजी वाढदिवस असून त्यानिमित्त टाव्हरे मोफत पुस्तके वाटपाचा उपक्रम राबवित आहेत,त्याबद्दल गडकरी यांनी टाव्हरे यांना लेखी पत्र पाठवून सदर उपक्रम निश्चितच महत्वपुर्ण ठरेल असा विश्वास असल्याचे नमुद आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,भाजपचे राज्याचे अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष, विधानपरिषद सदस्य,विधानपरिषद विरोधी पक्षनेते ते केंद्रीय मंत्री हा प्रवास अशोकराव टाव्हरे यांनी पुस्तकांतून उलगडला आहे.मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये पुस्तके असून गडकरींसारख्या मोठ्या नेत्याने व्यक्त केलेल्या भावना निश्चितच मोलाच्या आहेत असे टाव्हरे यांनी सांगितले.
अशोकराव टाव्हरे यांची कवी-लेखक,संपादक म्हणून दहा पुस्तके प्रकाशित आहेत.पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाचे तीन वर्षे आयोजन करीत असून भाजपचा गेली २६ वर्षापासूनचा निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.विविध सामाजिक प्रश्नांसाठी ते योगदान देत आहेत.
Comments
Post a Comment