लोकसंख्या, सामाजिक समतोल आणि राष्ट्रीय धोरणांवर चर्चा आवश्यक –

       महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांचे आवाहन 


मुंबई  / रमेश औताडे 

देशातील लोकसंख्या वाढ, संसाधनांचे नियोजन, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक समतोल या विषयांवर व्यापक राष्ट्रीय चर्चा होण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी व्यक्त केले.

त्यांनी सांगितले की, कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, संस्कार, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक जबाबदारी महत्त्वाची असते. कुटुंब व्यवस्थेबाबत निर्णय घेताना प्रत्येक नागरिकाने आपल्या परिस्थितीनुसार जबाबदारीने विचार करावा. लोकसंख्या धोरणाबाबत केंद्र सरकारने सर्व समाजांना समान निकष लागू होतील अशी स्पष्ट आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

देशात समान नागरी संहिता, समान शिक्षण व्यवस्था, समान कायदे आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर संसदेच्या माध्यमातून चर्चा व्हावी, असेही त्यांनी नमूद केले. लोकशाही मार्गाने नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना निवेदन, पत्र किंवा संदेश पाठवून विविध विषयांवर भूमिका मांडावी, असे आवाहन त्यांनी केले.

सेंगर यांनी सामाजिक सलोखा, संविधानाचा आदर आणि कायद्याच्या चौकटीत राहून मत व्यक्त करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कोणत्याही धर्म, समाज किंवा समुदायाविरोधात द्वेष निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“देशाची एकता, सामाजिक शांतता आणि भावी पिढ्यांचे सुरक्षित भविष्य हे सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतूनच मजबूत होऊ शकते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश