सुसंवादाने जगण्यासाठी आंतर-धार्मिक एकता परिषद


मुंबई / रमेश औताडे 
 
सर्व धर्मांमधील वाईट विचारधारेला नाकारणे आणि निसर्गाशी सुसंवादाने जगणे या दोन मुद्यावर आंतर-धार्मिक एकता परिषद होत आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते टी. एम. कृष्णा हे या परिषदेत प्रमुख भाषण देणार आहेत. आंतर-धार्मिक एकता परिषदेचे  संयोजक आणि इस्कॉनचे पदाधिकारी केशव चंद्र दास , आयआरएससीचे सह-संयोजक आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझमचे  संचालक इरफान इंजिनिअर, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, रामकृष्ण मिशन, मुंबई धर्मप्रांत आणि अजमेर शरीफ दर्गा यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधी, धार्मिक नेते परिषदेत सहभागी होणार आहेत.

जेसुइट धर्मगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ फादर फ्रेझर मास्कारेन्हास, डॉ. सुरिंदर कौर, अभिनेते जॉय सेनगुप्ता, टी. एम. कृष्णा आणि त्यांच्या चमूच्या कर्नाटकी संगीताच्या सायंकाळच्या कार्यक्रमाने याची सांगता होईल. सत्य बोला आणि आपल्यातील प्रामाणिकपणाचा स्वीकार करा. असा संदेश देण्यात येणार आहे. आपण एकमेकांच्या श्रद्धा समजून घ्यायला आणि स्वीकारायला शिकले पाहिजे. जेव्हा धर्मामागे दुष्ट हेतू असतो, तेव्हा तो अतिरेकी बनतो. आम्ही टप्प्याटप्प्याने ही दरी कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपले सत्य बोला आणि आपल्यातील प्रामाणिकपणाचा स्वीकार करा. अशी बहाई संस्थेच्या सचिव माहिती नर्गिस गौर यांनी दिली.


Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश