ख्रिश्चन सेल प्रदेश सरचिटणीसपदी प्रवीण तोरणे

मुंबई / रमेश औताडे 

सामाजिक कार्यकर्ते प्रवीण तोरणे  यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ख्रिश्चन सेल प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश निरीक्षक सेलचे अध्यक्ष धनंजय भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब साळवे , खासदार निलेश लंके  जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप वर्पे, तसेच जनसेवक धामोरकर, संजय भिमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

विविध पक्षीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी प्रवीण तोरणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रवीण तोरणे यांनी समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने काम करत जनसामान्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या वेळी खासदार निलेश लंके म्हणाले की, ख्रिस्ती समाजाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. बाळासाहेब साळवे यांनी ज्या मागण्या चे पत्र दिले आहे त्यासाठी  पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना प्रत्यक्ष भेटून पत्र देऊन पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.






Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री