इंडियन ऑईलकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत
मुंबई / रमेश औताडे
जगभरातील सप्लाय चेनमधील अडचणींनंतर महाराष्ट्रात मे २०२६ मध्ये इंधनाची मोठ्या प्रमाणात अधिक मागणी होऊनही इंडियन ऑईलने इंधन पुरवठा सुरळीत राखला आहे. इंडियन ऑईलने महाराष्ट्रातील सर्व आऊटलेटवर नियोजनबद्ध कार्यप्रणाली आणि प्रभावी लॉजिस्टिकचा समन्वय राखत प्रत्येक ग्राहकाला दररोज पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा सुरळीत व अखंड पुरवठा सुनिश्चित केला आहे.
ग्राहकांना दररोज २४ तास इंधनाचा पुरवठा करण्यासाठी इंडियन ऑईलने विशेष कार्यप्रणाली विकसित केली असल्यामुळे मागणीत वाढ होऊनही त्याचा पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही. मे २०२६ मध्ये महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किरकोळ विक्रीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत २२ टक्के वाढ झाली असून, डिझेलच्या किरकोळ विक्रीत ३३ टक्क्यांची भक्कम वाढ नोंदविण्यात आली आहे.
या वाढीमागे इतर पुरवठादारांच्या तुलनेत किंमतीतील फरकामुळे संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकांचा इंडियनऑईलच्या रिटेल आऊटलेट्सकडे वाढता कल तसेच हंगामी शेतीसंबंधित उपक्रमांमुळे निर्माण झालेली वाढती मागणी हे प्रमुख घटक आहेत. असे असले तरी मागणीत वाढ होऊनही इंधन पुरवठ्यात कोणताही खंड पडलेला नाही.
देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची इंडियनऑईलने पुन्हा एकदा खात्री दिली आहे. अखंड सेवा आणि सामूहिक जबाबदारीच्या भावनेतून इंधनपुरवठा सुरळीत, अडथळामुक्त आणि सातत्यपूर्ण राहावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
भारताच्या गतिमान प्रवासामागे असे एक जाळे कार्यरत आहे जे कधीच थांबत नाही — शेतापासून महामार्गांपर्यंत, डोंगरांपासून किनारपट्टीपर्यंत, कठीण भूप्रदेशांपासून आव्हानात्मक सीमावर्ती भागांपर्यंत इंडियनऑईल जागतिक अनिश्चिततेच्या काळातही अखंड इंधनपुरवठा सुनिश्चित करत आहे.
नागरिकांनी नेहमीप्रमाणेच इंधन खरेदी सुरू ठेवावी आणि कोणत्याही प्रकारची अनावश्यक घबराट किंवा अतिरिक्त साठेबाजी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
देश विश्वासावर चालतो आणि आम्ही आमच्या बांधिलकीवर. इंधन उपलब्धतेबाबत अचूक माहिती मिळवण्यासाठी ग्राहकांनी केवळ इंडियनऑईल आणि अधिकृत संस्थांकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच विश्वास द्यावा, असेही आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment