" प्रतिबिंबित करा, प्रतिध्वनित व्हा, आनंदित व्हा " या थीमवर यंदाचा कशीश प्राईड फिल्म फेस्टिव्हल



" प्रतिबिंबित करा, प्रतिध्वनित व्हा, आनंदित व्हा " या थीमवर

 यंदाचा कशीश प्राईड फिल्म फेस्टिव्हल

मुंबई / रमेश औताडे 


मुंबईत ३ ते ७ जून २०२६ दरम्यान होणाऱ्या १७ व्या कशीश प्राईड फिल्म फेस्टिव्हलची अधिकृत घोषणा करण्यात आली असून यंदा
 " प्रतिबिंबित करा, प्रतिध्वनित व्हा, आनंदित व्हा "  ही थीम जाहीर करण्यात आली आहे. लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्विअर आणि इतर लैंगिक ओळख असलेल्या समुदायाच्या भावना, संघर्ष, ओळख आणि सामाजिक वास्तव अधोरेखित करणाऱ्या चित्रपटांचा या महोत्सवात समावेश करण्यात आला आहे. 

मुंबईतील लिबर्टी सिनेमा, अलायन्स फ्राँसेज द बॉम्बे आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे हा महोत्सव रंगणार असून यंदा ४३ देशांतील तब्बल १५३ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमध्ये फीचर फिल्म्स, माहितीपट, लघुपट आणि विविध सामाजिक विषयांवर आधारित कलाकृतींचा समावेश आहे. 

फेस्टिव्हलमध्ये भारतासह नेदरलँड्स, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इराण, लेबनॉन, नामिबिया, निकाराग्वा, ट्युनिशिया आणि इतर अनेक देशांतील एल जी बी टी क्यू प्लस विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. दक्षिण आशियाई विभागात बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका येथील चित्रपटांचाही समावेश करण्यात आला आहे. 

भारतीय विभागात रोहन कनावडे दिग्दर्शित ‘सबर बॉन्डा’ हा चित्रपट विशेष आकर्षण ठरणार असून ‘क्विअरिंग इंडिया’, ‘अ मायन्युस्क्युल माइनॉरिटी’, ‘तुम्हारी खुशबू’ आणि ‘ना आवडती गोष्ट’ यांसारख्या चित्रपटांची विशेष चर्चा आहे. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्या "  प्रेम, लैंगिकता आणि फसवणूक २ " या चित्रपटाचे विशेष सादरीकरणही करण्यात येणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री