कडक उन्हावर हिरवागार उपाय
कडक उन्हावर हिरवागार उपाय
ट्री आर्मी करतेय पर्यावरण संवर्धन
मुंबई / रमेश औताडे
पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास पाहता उन्हाळ्यामध्ये तापमान वाढ झाल्याने त्यावर उपाय म्हणून हरित क्रांती उपक्रम आमदार सुहास बाबर यांनी ग्रीन आर्मी नावाने सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण होत आहे.
आमदार सुहास बाबर म्हणाले की एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ सकारात्मक बदल घडवू पाहत आहे. जनता स्वयंप्रेरणेने जागा, पाणी, झाडं, श्रमदान करण्यासाठी पुढे येत आहेत. ट्री आर्मी असं नामकरण लोकांनीच केलं असल्याचं आमदार बाबर म्हणाले. आपल्या मातोश्रींच्या श्राद्ध दिवशी ५३०० आंब्याची कलमे रुजवल्याची माहिती त्यांनी दिली. वन विभाग यांच्या माध्यमातून जपानी पद्धतीचा मियावकी जंगल तसेच गायरान जमिनीवर, रस्त्यालगत नैसर्गिकपणे उगवणारी झाडे रुजवण्याचा उपक्रम सुरु आहे.
५ जून रोजी होणाऱ्या वसुंधरा दिनानिमित्त अधिक प्रमाणात वड, पिंपळ, बहावा, करंज, चिंच अशा डेरेदार वृक्षांची लागवड सुरु आहे. व्यक्ती, व्यापारी संघटना, संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. नोकरी धंद्यानिमित्त खानापूर आटपाडीपासून दूर राहणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा आपल्या गावाशी नाळ जुळवायची असेल तर या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार सुहास बाबर यांनी केले.
Comments
Post a Comment