कुणी घर देता का घर असा नारा देत आंदोलनाचा इशारा

 मुंबई / रमेश औताडे 

सरकारने बेघर कोणी राहणार नाही असा आदेश निर्गमित केला आहे. मुंबई भाडेकर रहिवासी संघामध्ये जिथे भाडेकरू आहेत, त्या सर्वांना घरी मिळाले पाहिजेत. मुंबई शहरात गेल्या अनेक पिढ्यांपासून जुन्या चाळी, इमारती आणि झोपडपट्टी या वस्त्यांमध्ये मोठ्या संख्येने भाडेकरू राहत आहेत पुनर्वसनाच्या अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी विखुरलेल्या वैयक्तिक घर मालकांकडे राहणारे भाडेकरू मात्र या योजनांपासून वर्षानुवर्ष वंचित राहतात. त्यामुळे मराठी भूमिपुत्र बेघर होण्याची भीती निर्माण झाली आहे.


मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे, प्रभाकर कांबळे मुंबई भाडेकरू संघ अध्यक्ष, वनिता कांबळे मुंबई भाडेकरू महासंघ जिल्हाध्यक्ष, वनिता निकाळजे  मुंबई जिल्हा सचिव भाडेकरू रहिवासी संघ, संकल्पना कांबळे मुंबई कोषाध्यक्ष भाडेकरू रहिवासी महासंघ यांनी सरकारकडे याबाबत मागणी केली आहे.

म्हाडा व एस आर ए च्या पुनर्विकास योजनांमध्ये विखुरलेल्या भाडेकरूनना स्वतंत्र घटक म्हणून समाविष्ट करावे. पुनर्विकासातून निर्माण होणाऱ्या एकूण सदनिकांपैकी किमान २० टक्के सदनिका भाडे करून साठी राखीव ठेवण्यात याव्यात. भाडेकरू हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील असल्याने त्यांना अत्यल्प दरात आणि सरकारी अनुदानासह घरी उपलब्ध करून द्यावीत. केवळ भाडेपावती, रहिवासी दाखला आणि उत्पन्नाच्या दाखल्यावर आधारित त्यांची पात्रता निश्चित करून नोंदणी करण्यात यावी. 
 म्हाडा आणि इतर गृहनिर्माण संस्थांनी अशा विखुरलेल्या भाडे करून चे सर्वेक्षण करून त्यांना योजनेत सामावून घेण्याचे तातडीने आदेशित करावे. अन्यथा ८ मे २०२६ पासून आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे. 

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 
7021777291 रमेश औताडे 
संस्थापक संपादक

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री