जनतेला अंधारात कधीच ठेवणार नाही
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील वीज समस्येबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. महावितरणकडून अंधार पडल्यानंतर अचानक वीज बंद करणे व लोडशेडिंग लावणे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात देशमुख यांनी थेट ऊर्जामंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा फोन न उचलल्याने त्यांच्या पीए नी तातडीने प्रतिसाद देत लगेचच संबंधित महावितरणच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क जोडला.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून लोडशेडिंग थांबवावे, अशी ठाम मागणी देशमुख यांनी केली आहे.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
रमेश औताडे
संस्थापक संपादक 7021777291
Comments
Post a Comment