जोगेश्वरीत भव्य भीम जयंती महोत्सव उत्साहात

मुंबई / रमेश औताडे 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत त्रिपुरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित १३५ वी भीम जयंती महोत्सव जोगेश्वरी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते जयंतरावजी पाटील,  जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अजितदादा रावराणे, माजी नगरसेविका रूपालीताई रावराणे, त्रिपुरा फाउंडेशनच्या अध्यक्षा करिश्माताई सुरती, तसेच विकासक राजेश सुरती आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवनाथ खलसे, भगवान ढालवाले, प्रशांत नेब, उल्हास कसबे, सचिन म्हात्रे, सुरेखा लोंढे, स्वप्नील पाटील, रोहित कांबळे, सुरज मिश्रा, राजेश सकट, विजय कसबे, निलेश लोंढे, रोहित लोंढे, दिनेश राखपसरे आदी उपस्थित होते. या जयंतीचे आयोजन व संकल्पना सचिनभाऊ लोंढे जिल्हा अध्यक्ष युवक आणि निलेश लोंढे वॉर्ड अध्यक्ष युवक यांनी केले.

 “माता रमाई जीवन संग्राम पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार अमरजी कसबे, सुरेशजी सकट, राजू बोरसे, माणिकराव कसबे, उत्तम सकट, गणेश लोंढे, रमेश कसबे, दीपक लोंढे, किसन कसबे, शाम खनपटे, रामू सकट आदींना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा