स्वच्छता दूत फाउंडेशनची राज्यभर स्वच्छता मोहीम


मुंबई / रमेश औताडे 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १४ दिवसांपासून स्वच्छता दूत फाउंडेशन तर्फे राज्यभर स्वच्छता प्रशिक्षण व जनजागृती मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.  अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुकेश पाखरे यांनी दिली. स्वच्छता मनाची स्वच्छता घराची स्वच्छता परिसराची स्वच्छता देशाची अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हा संदेश घुमला.

या मोहिमेत गावपातळीपासून शहरांपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे, प्रात्यक्षिके आणि जनजागृती केली. आपला परिसर स्वच्छ मोहीम कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष मुकेश पाखरे, रिविका पाखरे व मार्गदर्शक रीना राव यांनी केले.

राज्याच्या विविध भागांत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर, तसेच वस्ती भागांमध्ये स्वच्छता उपक्रम राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.  डॉ. आंबेडकर यांच्या समतेच्या आणि स्वच्छ समाजाच्या विचारांना अभिवादन म्हणून ही मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांनीही याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. 

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 
संस्थापक संपादक रमेश औताडे 

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री