" राजा शिवाजी " चित्रपटाच्या नावात " छत्रपती " उल्लेख असावा
मुंबई / रमेश औताडे
"राजा शिवाजी" हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाबाबत श्री छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनने आक्षेप घेतला आहे. चित्रपटाच्या नावातून "छत्रपती" हा मानाचा किताब वगळणे अजिबात मान्य नाही. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा, प्रतिष्ठेचा व वारशाचा अवमान होत आहे असे फाउंडेशनचे अध्यक्ष सी. एस. चव्हाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
चित्रपटाचे निर्माते रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख आहेत. त्यांना आम्ही लेखी पत्र दिले आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचे सन्मानपूर्वक व ऐतिहासिकदृष्ट्या अचूक चित्रण करण्यात यावे, जर निर्माते व संबंधित प्राधिकरणांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी. आम्ही कायदेशीर पावले उचलण्याची आम्ही तयारी केली आहे. आवश्यक असल्यास देशभरात आंदोलन व निषेध करण्यात येईल असा इशारा दिला. या चित्रपटाचे निर्माते म्हणून रितेश व जेनेलिया देशमुख यांनी जबाबदारीने वागून हा विषय तात्काळ मार्गी लावावा असे चव्हाण यांनी सांगितले.
Comments
Post a Comment