उद्याच्या सक्षम व प्रतिभावान महिला क्रिकेटपटू

उद्याच्या सक्षम व प्रतिभावान महिला क्रिकेटपटू


पी आर न्यूज मिडिया नेटवर्क

दहिसर येथे मागील चार दिवस अत्यंत शिस्तबद्ध व काटेकोर पद्धतीने पार पडलेल्या निवड चाचण्यांची  यशस्वी सांगता झाली. एकूण 115 खेळाडूंमधून MCA अंडर-15 निवड समिती, प्रशिक्षक व निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 22 मुलींची अंतिम संघासाठी निवड करण्यात आली.

या महत्त्वपूर्ण प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी  नंदू पाटील, योगेश पुजारी, नजुका दवणे तसेच निरीक्षक श्री. विकास पाटील यांचे विशेष योगदान लाभले असून त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

*या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) तसेच दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन (डीएसएफ) यांचे विशेष आभार मानण्यात येत आहेत* .


पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी ते दहिसर परिसरातील होतकरू मुलींना क्रिकेट क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल एमसीएचे सचिव प्रा. डॉ. उन्मेष खानविलकर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

*तसेच, एमसीए अंडर-15 उन्हाळी शिबिरासाठी आवश्यक असलेली नेट्सची सुविधा अल्पावधीत उभारून दिल्याबद्दल दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनचे श्री. विनोद घोसाळकर व श्री. सौरभ घोसाळकर यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.*

अंतिम संघ जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल एसव्हीआयएसचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. योगेश पटेल यांचे आभार मानण्यात आले.

*या संपूर्ण उपक्रमात मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल श्री. नागेश ठाकूर व श्री. अल्बर्ट सर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.*

*हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नपूर्वक पाठ पुरावा केल्या बद्दल सौ वैशाली भिडे बर्वे आणि एडवोकेट रुपाली ठाकूर ह्यांचे देखील कौतुक करण्यात आले.* या उपक्रमाच्या माध्यमातून उद्याच्या सक्षम व प्रतिभावान महिला क्रिकेटपटू घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

— *वैशाली भिडे-बर्वे*
*माजी कर्णधार, मुंबई महिला क्रिकेट (अंडर-19)*
क्रीडा शिक्षण सल्लागार

*— अॅड. रुपाली ठाकूर*
*माजी क्रिकेटपटू व MCA च्या पहिल्या अधिकृत महिला स्कोअरर*
क्रीडा शिक्षण सल्लागार

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
संस्थापक संपादक रमेश औताडे
7021777291
rameshautade74@gmail.com


Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा