निदा खानवरील आरोप एकतर्फी व तथ्यहीन असल्याचा दावा


मुंबई / रमेश औताडे 

नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस  प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या समर्थनार्थ गुरुवारी मुंबई प्रेस क्लब येथे 
ए पी सी आर संस्थेने पत्रकार परिषद घेतली.  निदा खानवर लावण्यात आलेले आरोप तपासाअंती खरे खोटे बाहेर येईल, त्यामुळे माध्यमांनी व सरकारने दोन्ही बाजू पाहून बोलावे व छापावे अशी मागणी केली.

या प्रकरणाला जाणीवपूर्वक धार्मिक रंग देण्यात येत असल्याची टीका करत, ए पी सी आर संस्थेचे महासचिव शाकीर भाई शेख म्हणाले, “हे प्रकरण तपासाआधीच ‘कॉर्पोरेट जिहाद’ किंवा ‘धर्मांतर’ अशा स्वरूपात सादर केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. वक्त्यांनी सांगितले की, सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून अनेक बाबी अद्याप सिद्ध झालेल्या नाहीत. काही सामाजिक संस्थांच्या अहवालांचा दाखला देत, “पुरावे आणि सार्वजनिक चर्चेत मोठा फरक आहे,” असेही ते म्हणाले. 

यावेळी पत्रकार निरंजन टकले, तिस्ता सटेलवाड, संध्या गोखले, ॲड, नदीम खान, डॉल्फी डिसुझा, शाकीर भाई शेख उपस्थित होते.

यावेळी त्यांनी माध्यमांवरही टीका करत, “काही मीडिया ट्रायलमुळे आरोपींच्या बाजूने असलेले मुद्दे पुढे येत नाहीत,” निष्पक्ष चौकशी करूनच निष्कर्ष काढावा, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, नाशिक येथील या प्रकरणात लैंगिक छळ, जबरदस्तीचे संबंध आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा