देणं समाजाचे ....!

*प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा*

                  P R NEWS MEDIA NETWORK 

मुंबई, दि. १२ एप्रिल २०२६ 

प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थापक, सदस्य, मान्यवर अतिथी आणि समाजकार्यात रुची असलेले अनेक प्रतिष्ठित यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विश्वस्त सौ. वैशाली भिडे बर्वे यांच्या ईशस्तवनाने झाली. त्यानंतर त्यांनी PPT सादरीकरणाद्वारे फाउंडेशनच्या दोन वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. Youth Athletic स्पर्धा व पराक्रम दिवस यांसारख्या उपक्रमांची माहिती देत, संस्थेचे कार्यक्षेत्र क्रीडा व संस्कृतीपलीकडे साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातही विस्तारत असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यवरांनी स्वतःची ओळख करून देत आपल्या कार्याचा परिचय दिला. ६२ व्या वर्षी मॅरेथॉन सुरू करून ८२ व्या वर्षीही अविरत धावणाऱ्या धावपटूंच्या प्रेरणादायी प्रवासाने उपस्थितांना प्रेरित केले. तसेच आदिवासी भागात सोलर पॅनल, रोजगारनिर्मिती व युवक प्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या समाजसेवकांनी अनुभव मांडले. साहित्य, शिक्षण व समाजकार्यातील योगदानाबद्दल एका लेखिका व प्राचार्यांचा गौरव करण्यात आला.

Nrutnatya Productionच्या प्रतिनिधींनी मराठी भाषा व संस्कृती जपण्याचे महत्त्व सांगत १ मे रोजी होणाऱ्या विशेष कार्यक्रमाची माहिती दिली.

विश्वस्त मा. महादेव गोविंद रानडे यांनी संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश, समाजप्रबोधनाची भूमिका व Annual Membership विषयी मार्गदर्शन केले. व्यवस्थापकीय विश्वस्त ॲड. रुपाली ठाकूर यांनी आगामी सामाजिक उपक्रमांची माहिती देत समाजहितासाठी व्यापक काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

ॲड. रुपाली ठाकूर व सौ. वैशाली भिडे बर्वे यांच्या कार्यतत्परतेचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. स्नेहभोजन व संवादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हा वर्धापन दिन समाजप्रेरणा व नव्या सामाजिक संकल्पनांचा प्रभावी संगम ठरला.

P R NEWS MEDIA NETWORK 
Founding Editor Ramesh Autade 7021777291

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा