एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँड शुभारंभ
एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँड शुभारंभ
मुंबई / रमेश औताडे
होमलेन या भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञान व एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँडने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे आपला पहिला स्टुडिओ लाँच केला आहे. प्रबळ पायाभूत सुविधा आणि मुंबई महानगर क्षेत्राशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे बेलापूर हे महत्त्वाचे व्यापारी आणि निवासी केंद्र म्हणून ओळखले जाते.
हा स्टुडिओ संतोष कुमार जे आणि पार्थिबन सुधमन यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आला आहे . होमलेनचे सह-संस्थापक आणि सीओओ तनुज चौधरी म्हणाले, नवी मुंबई आमच्यासाठी नेहमी महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे, विशेषतः सीबीडी बेलापूरसारखी ठिकाणे, जिथे प्रबळ पायाभूत सुविधांमुळे निवासी क्षेत्रात शाश्वत वाढ होत आहे.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत संतोष कुमार जे म्हणाले, नवी मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये आता संघटित इंटीरियर सोल्यूशन्सला अधिक पसंती दिली जात आहे. या लाँचसह, होमलेनने शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार सुरूच ठेवला आहे, तसेच सुलभ उपलब्धता, स्थानिक भागीदारी आणि तंत्रज्ञानावर आधारित सुव्यवस्थित इंटीरियर अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
Comments
Post a Comment