सामाजिक बांधिलकी जपणारे प्रतिष्ठान

मुंबई / रमेश औताडे 

राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त पवना हाॅस्पीटल सोमाटणे फाटा येथे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड या संस्थेच्या वतीने आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागातील २५० रूग्णांना फळे व बिस्कीटे यांचे वाटप  पवना हाॅस्पीटलचे कार्यकारी संचालक डाॅ.सत्यजित वाढोकर, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष लेखक अशोकराव टाव्हरे, डाॅ.भाऊसाहेब फुके, सुरेखा टाव्हरे यांच्या हस्ते करण्यात आले.
आरोग्य, सार्वजनिक बांधकाम,पाणीपुरवठा,महिला व बालविकास, उर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. रूग्णांना फळे व बिस्कीटे वाटप करून शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली असे मत डाॅ.सत्यजित वाढोकर यांनी व्यक्त केले.
 
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 
संस्थापक संपादक रमेश औताडे 
7021777291

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश