इराणमध्ये ' बहाई ' पंथाच्या व्यक्तीवर वाढते अत्याचार

मुंबई / रमेश औताडे

' बहाई ' पंथाचे २९ वर्षीय अनुयायी बोर्ना नईमी यांच्यावर इराणमध्ये झालेल्या क्रूर छळाबाबत बहाई समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. १ मार्च रोजी केरमान येथे अटक झाल्यापासून, बोर्ना यांना किमान दोनदा फाशी देण्याचा केवळ आभास निर्माण करण्याचा प्रकार व विजेचे धक्के देऊन आणि शारीरिक व मानसिक छळ सुरू केला आहे. 

या अगोदर त्यांचे चुलत भाऊ पयवंद नईमी यांची घटना अशीच होती. या दोन्ही घटना इराणमधील 'बहाई' पंथाच्या अनुयायांवरील अत्याचारांमध्ये अत्यंत चिंताजनक वाढ झाल्याचे संकेत आहे. 'बहाई' हा इराणमधील मुस्लिमेतर धार्मिक अल्पसंख्याकांचा सर्वात मोठा गट आहे. जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांमधील 'बहाई आंतरराष्ट्रीय समुदाया'च्या प्रतिनिधी, सिमिन फहांदेज यांच्या मते "केवळ आपल्या श्रद्धेसाठी इतक्या क्रूर छळाला सामोरे जाणाऱ्या या कुटुंबाबद्दल मनात असीम वेदना आणि दुःख न वाटणे अशक्य आहे. इतिहास केवळ या निर्दय कृत्यांचीच नोंद घेणार नाही, तर अकल्पनीय दबावाखालीही आपल्या श्रद्धांवर ठाम राहणाऱ्या लोकांच्या धैर्याचीही नोंद घेईल." 

बोर्ना यांना कैद्यांच्या भाषेत 'डेथ सूट' (मृत्यू कक्ष) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागात ठेवण्यात आले होते. हा विभाग फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी राखीव असतो. त्यांना एका लहान, खिडकी नसलेल्या जागेत बंदिस्त करण्यात आले होते. सुश्री फाहंदेज पुढे म्हणाल्या, या प्रकरणांमधून खोटे आरोप रचण्याचा आणि निरपराध व्यक्तींना त्यांनी न केलेल्या गुन्ह्यांचे गुन्हेगार म्हणून चित्रित करण्याचा अथक प्रयत्न दिसून येतो. 

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा