राज्यातील कामगारांच्या प्रश्नावर आक्रोश मोर्चा



मुंबई / रमेश औताडे 

महाराष्ट्रातील कामगारांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने १६ एप्रिल २०२६ रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.  हा मोर्चा मुंबईतील बांद्रा पूर्व येथील कामगार आयुक्त कार्यालयावर धडकणार असून यात सुमारे पाच हजार कामगार सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अनिल डुमणे व महामंत्री किरण मिलगिर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात उद्योग, ऊर्जा, कृषी, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी धोरणे असली तरी कामगारांसाठी स्वतंत्र धोरण नाही, राज्यातील कंत्राटी, बांधकाम, घरोघरी काम करणारे कामगार, आशा व अंगणवाडी सेविका, फेरीवाले, बीडी कामगार, रिक्षा-टॅक्सी चालक, पेन्शनधारक तसेच विविध उद्योगांतील कामगार यांच्या मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन २२ संघटनांच्या मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

मोर्चाच्या माध्यमातून राज्यासाठी स्वतंत्र कामगार धोरण तयार करणे, शासनातील कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करणे, प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा रुग्णालय सुरू करणे, बांधकाम कामगार मंडळातील भ्रष्टाचार थांबवणे, वीज कंपन्यांचे खाजगीकरण थांबवणे, तसेच विविध उद्योगांतील कायम व कंत्राटी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा