घणसोलीच्या समस्यावर नगरसेविका वैशाली मस्कर यांची महासभेत मुद्देसूद मागणी
घणसोलीच्या समस्यावर नगरसेविका वैशाली मस्कर यांची महासभेत मुद्देसूद मागणी
प्रतिनिधी / नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय
नवी मुंबईतील घणसोली परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मूलभूत समस्यांकडे नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत नगरसेविका वैशाली मस्कर यांनी नागरिकांच्या प्रश्नांना जोरदारपणे वाचा फोडत महापौर उपमहापौर आयुक्त व संबंधित यंत्रणांना समस्या दूर करण्याची आपल्या भाषणातून सविस्तर मागणी केली.
रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची अनियमितता, सांडपाणी व्यवस्थेतील त्रुटी, वाढती घाण व आरोग्यविषयक समस्या, तसेच पार्किंग समस्या, नामकरण विषय , नागरिक हॉलमधील परिपूर्ण किचन, सेंट्रल पार्क मधील अनधिकृत गर्दी, अनधिकृत फेरीवाले, वाढत्या डासांच्या समस्येसाठी धूर फवारणी, मुलांचे खेळाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे मैदान, पार्किंगसाठी मोकळ्या भूखंडाची मागणी, दुर्गंधीयुक्त नाल्यांचा बंदोबस्त, या सर्व सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी यावर सविस्तर भाषण करत नगरसेविका वैशाली मस्कर यांनी सभागृहात महापौर यांच्या निदर्शनास आणून देत रेकॉर्डवर आणल्या.
“घणसोलीतील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. येत्या काळात या प्रश्नांवर कोणती ठोस पावले उचलली जातात याचा पाठपुरावा करणार असल्याची माहिती नगरसेविका वैशाली मस्कर यांनी महासभेनंतर पी आर न्यूज मिडिया नेटवर्क शी बोलताना दिली.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
संपादक रमेश औताडे 7021777291
Comments
Post a Comment