मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोनार समाज्याच्या मागण्याबाबत सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोनार समाज्याच्या मागण्याबाबत सकारात्मक -
गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती
मुंबई / रमेश औताडे
राज्यांतील गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून काही मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गांभीर्याने घेतल्या आहेत. लवकरच एक बैठक घेऊन मागण्या पूर्ण करू. असे आश्वासन सहकार राज्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने मुंबईत आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले.
सोनार समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करून न्याय मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
आमदार चित्राताई वाघ यांनी विधान भवनात सोनार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यावर मार्ग काढण्यासाठी खूप पाठपुरावा केला. सोने गहाण ठेवण्याच्या प्रकियेत हा घटक खूप महत्त्वाचा असतो. असेही चित्रा वाघ यांनी म्हटले.
प्रमुख मार्गदर्शक संजीव खडके, अध्यक्ष डॉ राजेंद्र दिंडोरकर, कार्यकारी सचिव सतीश पितळे, खजिनदार दीपक देवरुखकर, सल्लागार भरत ओसवाल, पद्मिनी ताई शंकरशेट आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment