महसूलमंत्र्यांच्या लेखी आदेशाला केराची टोपली
महसूलमंत्र्यांच्या लेखी आदेशाला केराची टोपली
राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार !
मुंबई / रमेश औताडे
महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून दिलेल्या लेखी आदेशाला सरकारी बाबू केराची टोपली दाखवत असतील तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार !
मौजे बुरूंजवाडी,ता.शिरूर. जि.पुणे येथील गट नं १५७ बाबत तीन संपादनशीट असून तसेच ८८ आर क्षेत्र परस्पर कमी करून केलेला अन्याय,उपअधिक्षक भुमी-अभिलेख यांनी अपिल करता येऊ नये म्हणुन आदेशाची उशिरा समज देऊन तातडीने केलेली मोजणी, महसुलमंत्री यांनी दोन वेळा लेखी निर्देश देऊनही सुनावणीची प्रक्रीया न केल्याने तातडीने सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत सदर गटातील हद्द कायम करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी यासाठी भाऊसाहेब बाजीराव नळकांडे हे शेतकरी बुधवार १५ नोव्हेंबर २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करणार आहेत.
राज्याचे महसुलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन निवेदने दिली होती तसेच भेटही घेतली होती,त्यानुसार दि.०४/०९/२०२५ व दि.०७/०१/२०२६ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांना रितसर चौकशी करून नियमानुसार मुदतीत उचित कार्यवाही करावी असे लेखी निर्देश दिले होते.सदर प्रकरणी बोगस धरणग्रस्तांना जमीन वाटप केलेली आहे.
महसुलमंत्री यांच्या निर्देशाची कोणतीही दखल जिल्हा प्रशासनाने घेतली नाही.मा.उपअधिक्षक,भुमी-अभिलेख शिरूर यांनी सदर गटातील मोजणी प्रक्रीया होण्यासाठी दिलेल्या हरकत अर्जाची सुनावणी घेऊन आदेशावर दि.२८/११/२०२५ ही तारीख असताना जाणूनबुजून दि.०८/०४/२०२६ ला निकालाची समज उशिरा दिली व तातडीने दि.१०/०४/२०२६ ला प्रतिवादी यांच्याशी संगनमत करून मोजणी करण्याचा खटाटोप केला असा आरोप नळकांडे यांनी निवेदनात केला आहे.
महसुल मंत्री यांच्या आदेशाची अधिकारी अंमलबजावणी करीत नसतील तर न्याय कोठे मागायचा ? त्यामुळे तातडीने हद्द कायम करण्याची प्रक्रीया स्थगित करावी व सदर प्रकरणी मा.अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांनी सुनावणी होऊन निर्णय द्यावा यासाठी बुधवार दि.१५ एप्रिल २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करणार असल्याचे भाऊसाहेब नळकांडे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment