आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
बहुजन मुक्ती पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दि ३० जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन नियोजिले होते, तसेच राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या अथक परिश्रमाने मा श्री वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आधिपत्याखाली हे आंदोलन यशस्वी रित्या पार पडले. प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी वर्गाने आंदोलनाचे गांभीर्य न घेता शुल्लक कारणे देत जनिपूर्वक अन्याय करण्याचा कट रचला होता असे दिसून आले. परंतु आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी सादर आंदोलनाची दखल घेत संघटनेला वेळ दिला व आंदोलन दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समयसूचकतेने आयुक्त यांच्याकडे धाव घेतली व चर्चे माध्यमातून सदर मागन्यांचा मुद्दा निकाली काढला व तत्काळ नमूद मागण्या बाबत प्रशासकीय अधिकारी यांना प्रस्ताव पाठऊन मान्यता घेउन अशे आश्वासन आयुक्तांनी दिले. DMER सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत पद वाढ व कमी करण्याचा अधिकार शासनाने राखून ठेवला आहे ज्यामुळे आम्ही ९०० परीसेविका यांची पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या या जागांचा प्रस्ताव शासनास तत्काळ पाठून मान्यता घेऊ. -आयुक्त (वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुम्बई) सदर झ...