९८ वर्षांच्या गुप्ते काकांचा विशेष सन्मान

                                                      
सी.के.पी. समाज, बोरीवली यांचे वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. बोरीवलीचे ९८ वर्षीय ज्येष्ठ सदस्य  श्री. अनंत भास्कर गुप्ते यांचा विशेष सन्मान हे या वार्षिक स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य होते.  वैश्य समाज हॉल, बोरीवली (पूर्व) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज (सी.के.पी.), बोरीवली ही नोंदणीकृत संस्था असून या संस्थेतर्फे ज्ञाती बांधवांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. प्रतिवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यंदा देखील या स्नेहसंमेलनाचे आयोजन वैश्य समाज हॉल, बोरीवली (पूर्व) येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनात ज्ञाती बंधु-भगिनींनी अगत्याने उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला. सांस्कृतिक, वैचारिक देवाण -  घेवाण हा यामागचा मुख्य हेतू असून ज्ञाती बांधवांमधील वर्धिष्णू वृत्ती जतन करण्यावर भर आहे.

वार्षिक स्नेह संमेलन, महिलावर्गाकरिता पारंपरिक हळदी-कुंकू समारंभ, विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. श्री.संजय दिक्षित यांच्या संयोजनाने सी.के.पी. कलावंतांनी एकत्रित येऊन साकारलेला 'ज्ञाती झंकार' या वाद्यवृंदाचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आले होते. सुमधुर मराठी – हिंदी गीते सादर करण्यात आली, त्याला रसिकांनी दाद दिली.
 
गुप्तेकाका म्हणून परिचित असलेले चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज (सी.के.पी.), बोरीवलीचे ९८ वर्षीय ज्येष्ठ सदस्य  श्री. अनंत भास्कर गुप्ते यांचा करण्यात आलेला सत्कार हे कार्यक्रमाचे आकर्षण केंद्र  होते.

संस्थेचे विश्वस्थ श्री. नितीन पालकर यांनी समाजातील थोर व्यक्तींनी केलेल्या ऐतिहासिक योगदानाचा उल्लेख आपल्या मनोगतात व्यक्त केला. तसेच समाजातील तरुणांनी अधिकाधिक पुढाकार घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासाची धुरा उचलण्याचा मानस व्यक्त केला. 

श्री.राजभाऊ खोपकर आणि श्री.विलास देशमुख यांच्या संकल्पनेतून अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या सी.के.पी. समाज (बोरीवली), वधु-वर सूचक मंडळाच्या कार्याचा गौरव देखील यावेळी करण्यात आला. सदर संस्थेचे कार्यवाह श्री. उदय मथुरे यांनी संस्थेच्या विविध उपक्रम आणि  आगामी कार्यक्रमांची विस्तृत माहिती दिली. या स्नेहसंमेलनास उत्स्फूर्तपणे उपस्थित रहिलेल्या ज्ञाती बांधव -  भगिनींचे  तसेच संस्थेच्या आर्थिक बाजू सावरणाऱ्या देणगीदारांचेही आभार मानले.

पी आर न्यूज नेटवर्क 
संपादक रमेश औताडे 

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने