स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

          
             स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने


नवी मुंबई / रमेश औताडे 


स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष उमेश जुनघरे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शिधावाटप अधिकारी छाया पालवे यांना घणसोली मधील शिधावाटप दुकानावर कारवाई करण्याबाबत नवी मुंबई शिधावाटप अधिकारी छाया पालवे यांना यांना निवेदन देण्यात आले.

राज्यातील गरीब, गरजू तसेच पात्र लाभार्थ्यांना निवडक जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था हे एक माध्यम आहे. या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील महत्त्वाचा भाग असलेले रास्तभाव / शिधा वाटप दुकाने अर्थात रेशन दुकाने ही जीवनावश्यक वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. 

मात्र, या जीवनावश्यक वस्तू विहित वेळेत जनतेमध्ये वाटप करणे गरजेचे असताना दुकानदाराकडून मात्र या ग्राहकोपयोगी वस्तूचे वेळेत, नियमित आणि दररोज वाटप होत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात करत आहेत.

रेशन दुकानदारांकडून ग्राहकोपयोगी वस्तूचे वाटप सुस्थिती होण्यासाठी दुकाने सकाळी व दुपारी प्रत्येकी चार तास उघडी ठेवण्यात यावीत असे अप्पर जिल्हाधिकारी यांचे आदेश असतांना सुद्धा दुकान मालकाकडून नियमाचे उल्लंघन करताना दिसून येत आहे.

तसेच या व्यतिरिक्त संसदीय लोकलेखा समितीने केलेल्या सूचना आणि नियंत्रण आदेश २०१५ च्या कलम दहा मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांनी सूचना फलक लावणे , दुकानातील फलकावर वितरित करण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे प्रमाण, किरकोळ विक्रीचे मूल्य, अन्नधान्याची पात्रता, दुकान उघडणे व बंद करण्याची वेळ, भोजनाची वेळ, अन्नधान्याचा दर्जा आणि प्रमाण, काही तक्रार असल्यास ती कोणत्या अधिकाऱ्याकडे कराव्यात, या बाबतची माहिती तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन क्रमांक इत्यादी माहिती फलकावर देणे बंधनकारक आहे. 

महिन्याच्या कोणत्याही दिवशी म्हणजे महिन्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत लाभधारक रेशन दुकानात रेशन घेण्यास आल्यास त्याला दुकानदाराने धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील असे नियम लागू असतांना हे सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांची गैरसोय केली जाते . तरी यांच्या कठोर कारवाई करून सुद्धा दुकान मालक नियम पाळत नसतील तर शिधावाटप दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला अशी मागणी करण्यात आली.

यावेळी विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष विनायक जाधव , नवी मुंबई सरचिटणीस विनायक चव्हाण, सचिव प्रतीक मोरे तसेच कार्यकर्ते  इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"