महाराष्ट्र राज्य लॉटरी मधुन महाराष्ट्र सरकारला ७०० कोटी पेक्षा जास्त महसुल व मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो -
महाराष्ट्र राज्य लॉटरी मधुन २०२३-२४ मध्ये २ कोटी नफा आणि १८ कोटी जी.एस.टी. हा फक्त ४ ड्रॉ मध्ये मिळालेला आहे. उरलेले २० ड्रॉ ऑनलाईन आणि पेपर लॉटरी माध्यमातुन वर्षाला ७०० कोटीपेक्षा जास्त सरकारला महसूल भेटू शकतो. त्या उत्पन्नातून सरकार अनेक लोककल्याण कार्य करु शकते. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळणार आहे.अशी माहिती लॉटरी ट्रेड एजंट असोसिएशन या व्यापारी ट्रेड युनियन चे अध्यक्ष व श्री इंटरप्राईजेस दादर चे मालक वितरक तसेच " लॉटरी रोजगार निर्माण महाकृती समिती " चे वरिष्ठ पदाधिकारी स्नेहल कुमार शहा यांनी दिली आहे
वेस्ट बंगाल सरकारला ४००० ते ५००० कोटी आणि केरळ सरकारला ३००० ते ३५०० कोटी लॉटरी उद्योगातून भेटत आहे. अरुणाचल, मिलोरम, नागालँड, मणिपूर, सिक्कीम, गोवा, या सारख्या राज्यामध्ये त्यांचे जे वार्षिक उत्पन्न आहे. त्यात लॉटरीचे खुप मोठे योगदान आहे. महराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत या सर्वाच्या पुढे आहे तर आपण पहील्या वर्षी ७०० कोटी आणी पुढे या पेक्षा जास्ती महसुल व रोजगार देऊ शकतो असे स्नेहल कुमार शहा म्हणाले.
या बाबतीत चर्चा करण्यासाठी सरकारने आम्हाला वेळ द्यावा चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. चर्चेमध्ये सध्याचे मुख्य उद्योजक, युनियन नेते आणि लॉटरी विभाग अधिकारी यांना सहभागी करुन घ्यावे व लवकरात लवकर त्यांचा बरोबर आपण संयुक्त बैठक घ्यावी.
लॉटरी उद्योग पूढे नेण्यासाठी, तिकीट विक्री वाढवण्यासाठी काही बदलाव सूचविले आहेत ते असे आहेत की, डिजिटल युगात प्रसिद्धि महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या १४ करोड जनतेकडे आपल्या महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या सोडती माहिती य पेपर जाहिरात, न्यूज चॅनल, डिजिटल मिडिया, लॉटरी स्टॉलवर शासन लॉटरीची प्रसिद्धि, सरकारी माध्यमाने एस. टी. डेपो, बस डेपो, जिथे प्रसिद्धी होऊ शकते अशा सार्वजनिक ठिकाणावर प्रसिद्धी करण्यात यावी.
देशाच्या प्रमुख राज्यांमध्ये जिथे लॉटरी चालते. त्यामध्ये अधिकांश राज्यांमध्ये लाईव्ह ड्रॉ डिजिटल मिडियाच्या माध्यमावंर करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र राज्य लॉटरी ज्यासाठी प्रसिद्ध होती. सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष अतिथीच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते ड्रॉ करण्यात यावा. व ग्राहकांना महाराष्ट्र राज्य लॉटरी काढण्यासाठी प्रेरित करण्यासाठी चांगली बक्षिस योजना. इतर राज्यांच्या लॉटरी प्रमाणे महाराष्ट्र राज्य लॉटरीची तिकीटे अनसोल्ड करण्यात प्रक्रिया चालू करण्यात यावी. जेणे करून जास्तीत-जास्त विक्रेते महाराष्ट्र राज्य लॉटरी विकण्यास सुरूवात करतील व रोजगारात वाढ होईल.
तसेच जवळपास असलेल्या कोणत्याही ठिकाणावर विक्रेत्यांना सातही दिवस तिकीट उपलब्ध असायला पाहिजे. बंपर तिकिट ची विक्री साठी दोन महिने अगोदर डिस्ट्रीब्युटर आणि विक्रेत्याकडे तिकिट उपलब्ध असायला पाहिजे. आर्थिक गुंतवणूक आणि अकाऊटींग सामान्य विक्रेताही आपकल्या कडून तिकिट घेवू शकते अशी योजना. जास्तीत-जास्त विक्रीसाठी उशीराने ड्रॉ टाईम देण्यात यावा.
विक्रेत्यांच्या फायद्यासाठी जास्तीत जास्त कमीशन दिले जावे, जेणे करून विक्रेता महाराष्ट्र राज्य लॉटरीचीविक्री करण्यावर भर देईल. बक्षिस वर विक्रेत्यांना बोनस दिला जावा. मुख्य अभिकर्ता आणि विक्रेता या सर्वाना न्याय संगत कमीशन योजना असायला पाहिजे. अन्य राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीची विक्री जशी महाराष्ट्रात इतर राज्यांची तिकीटे विकली जातात. तशीच इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याची तिकिटे विकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. पूर्ण महाराष्ट्रामधून कुठुनही ऑनलाईन पेमेंट झाल्यावर महाराष्ट्र लॉटरी विभागाने कुरिअरने तिकीट पाठवावी.
लॉटरी वर 28% GST कमी व्हावा. लॉटरी उद्योगवर 28% GST मुळे विक्री कमी आहे. GST कमी झाल्यावर बक्षीस रचना चांगली होणार आणि विक्री वाढणार. विशेष लॉटरी ला बघण्यासाठी स्वतंत्र प्रभार म्हणून लॉटरी आयुक्त नेमणुक मिळायला पाहिजे.
महाराष्ट्रात प्रमुख ६ मोठे बंपर आहेत आणि इतरही ज्याची विक्री जास्त आहे ते हमीपात्र व्हायला पाहिजे.
तिकीट इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रिटींग झाले पाहिजे. कारण इतर राज्यामध्ये जेव्हा तिकीट विकू तेव्हा ती विक्री मध्ये वाढ होणार. महारष्ट्र सरकारने राज्य लॉटरीचे २४ ड्रॉ आयोजीत करणे
महाराष्ट्र सरकारकडे सध्या २४ ड्रॉ ऑनलाईन आणि पेपर ड्रॉ आयोजीत करू शकते पण ते फक्त ४ ड्रॉ चा उपयोग करते. २४ ड्रॉ लॉटरीच्या माध्यमाने चालू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पी आर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य
संपादक रमेश औताडे
Comments
Post a Comment