आचारसंहिते पूर्वीची " उमेद"
मुंबई / रमेश औताडे
निवडणुका आल्या की मतांच्या जोग्व्यासाठी सरकार विविध कल्याणकारी योजनांचा पाऊस पाडत असते. मात्र या योजना पूर्ण होण्यासाठी जे कागदी घोडे नाचवावे लागतात त्या काळात आचारसंहिता येते व पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था जनतेची होत असते. असाच प्रकार " महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान " उमेद चा झाला आहे.
उमेद च्या स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत २८०४ कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे. या व इतर मागण्या घेऊन आझाद मैदानात राज्यभरातील उमेद च्या आंदोलनकर्त्यानी सरकारला जागे करण्यासाठी उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. प्रभाकर गावडे, स्वप्नील शिर्के, रुपाली नाकडे, प्रभाकर गावडे,निर्मला शेलार,अलंकार बनसोडे, बाबासाहेब सरोदे आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
उमेद संघटनेच्या वतीने ७ ऑक्टोबर २०२४ पासून आझाद मैदान येथे प्रभाकर गावडे संघटनेचे मार्गदर्शक तथा कृती समिती सदस्य प्रेरिका आमरण उपोषणाला बसले आहेत. सर्व महिला व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. शासनाकडून मागणी पूर्ण झाल्याचा शासन निर्णय घेतल्याशिवाय दसऱ्याला घरी जाणार नाही. असा इशारा देत त्यांनी आझाद मैदान घोषणांनी दुमदुमून टाकले आहे.
आम्हा ८४ लाख कुटुंबाना न्याय मिळवून देणेसाठी शासन निर्णय काढून त्वरित अंमलबजावणी आदेश द्यावेत. जेणेकरून आम्ही दसऱ्याच्या सणाला आनंदाने गावी जाऊन पेढे वाटू अशी मागणी त्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment