मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा

            मेघमल्हार संकुल अन्  एकोणीस सेवक .....

नवी मुंबई / रमेश औताडे 

नवी मुंबईतील चर्चेत असलेल्या मेघमल्हार सिडको वसाहत सोसायटी निवडणुकीत लोकनेते वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील तुषार नाईक पॅनलने १९–० असा दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. या निकालामुळे नवी मुंबईत नाईक गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी एक मजबूत पायाभूत वातावरण तयार झाले आहे.

२०१८ साली सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतून तयार झालेल्या मेघमल्हार सोसायटीने सुरुवातीपासूनच आपल्या पारदर्शक आणि जनतेसाठीच्या कार्यपद्धतीने वेगळा ठसा उमटवला होता. सोसायटी नोंदणीसाठी दलालांनी लाखो रुपये मागितले असतानाही मुख्य प्रवर्तक रमेश औताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या १९ रुपयांच्या सरकारी शुल्कात केवळ २३ दिवसांत नोंदणी पूर्ण करत नवी मुंबईत एक आदर्श निर्माण करत एक इतिहास नोंदवला. कमी वेळेत व सर्वात कमी पैशात नोंदणी झालेली मेघमल्हार सोसायटी एकमेव सोसायटी ठरली असल्याची पावती सिडको अधिकाऱ्यांनी व निबंधक कार्यालयाने दिली.

याच पार्श्वभूमीवर मतदारांनी तुषार नाईक यांच्या नेतृत्वाखाली रमेश औताडे व त्यांच्या १९ मावळ्यांच्या  कार्याची दखल घेत  त्यांच्या पॅनलला भरघोस मतदान केले. पॅनल प्रमुख तुषार नाईक यांनी निवडलेल्या खंदे कार्यकर्त्यांची मोट बांधत सशक्त टीम उभारली.एकीचे बळ काय असते याची प्रचिती दाखवली.

संकुलाचे सचिव संतोष ढेपे, महिला उमेदवार भारती निलेश चिकने, तसेच लिखाण योगी योगेश कोंडे, अमोल मोरे, संगीता अनिल ढोकरे, खजिनदार विनोद रटाडे,सूक्ष्म निरीक्षण करणारे गणेश निकम, दत्तात्रय नवघने, संदीप नरवडे, भरत शिर्के, सूरज पाटील, परशुराम पाटील, सोमनाथ शिंदे, भरत पटाडे, गौरेश कदम, आणि सोसायटीत पहिल्यापासून कार्यरत असणारे बाबासाहेब ढोले यांनी मिळून संघटनेला जे बळ दिले त्याचे फळ म्हणजे १९- ० असा विजय आहे.

या विजयासह नवनिर्वाचित समितीने संकुलात कार्यारंभ करताच मतदारांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. सोसायटीमध्ये सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.सिमेंट काँक्रिट या शहरात मधमाशीचा व तिच्या जीवाचा विचार करणारा व खुर्चीपेक्षा संकुलाचे गोकुळधाम कसे होईल या विचाराची अर्धांगिनी सोबत घेऊन गाडगेबाबा ची भूमिका वठवणारा एक भक्त संकुलाला मिळाला असल्याने संभाव्य गोकुळधाम मध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पारदर्शक कारभार सुरू झाला आहे.





Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री