नाही तर आरोग्य यंत्रणा आजारी पडेल
राज्यातील सरकारी आरोग्य विभागात महत्वाची भूमिका बजावणारी स्टाफ नर्स व स्टाफ ब्रदर आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. सरकारने जर आमच्या मागण्यांचा विचार गांभीर्याने केला नाही तर आरोग्य यंत्रणा आजारी पडेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
आरोग्य विभागात ९०० जागा रिक्त असताना जर आम्हाला आंदोलन करत नोकरी मागावी लागत असेल तर यासारखे दुर्दैव नसावे. असे यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रेमराज बोबडे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना अभिलाष टेकाडे यांनी सांगितले की, वयोमर्यादा संपून गेल्यावर जर आम्हाला नोकरी मिळत असेल किंव्हा मयत झाल्यावर नोकरी मिळणार असेल तर त्या नोकरीचा काय फायदा.
सरकारने जर आता आमच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करणार नसेल तर राज्याची आरोग्य यंत्रणा बंद पडू शकते असा इशारा यावेळी या आंदोलनकर्त्या उमेदवारांनी दिला आहे.
Comments
Post a Comment