वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्थ आक्रमक होणार

      मंत्री मकरंद पाटील यांच्याशी चर्चा करताना पांडुरंग कुंभार 


मुंबई / रमेश औताडे 

शासनाच्या मदत व पुनर्वस विभाग यांच्या  कार्यालयाकडून वेळोवेळी सुचना व लेखी पत्र देवूनही अदयाप संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्याकडून
वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्थांच्या मागण्यांची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता आंदोलन करणार असल्याचा इशारा समाजसेवक पांडुरंग कुंभार यांनी दिला आहे.

वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्थांचे जमिन वाटपाचे आदेश काढण्यासाठी शासन नियमाप्रमाणे संक्लन कार्ड/६५टक्के पावती १२/२ नोटीस बंदी दिनांका पुर्वीचे ७/१२उतारे, फेरफार, ८ अ नमुना उतारे, चालु फेरफार व ७/१२ खाते उतारे, असे सर्व पेपर घेत होते. त्याप्रमाणे मी हि हे सर्व पेपर अर्जा सोबत जोडले आहेत. तसेच सातारा जिल्हा पुनर्वस आधिकारी व उपविभागीय आधिकरी कराड यांनी सांगली जिल्हा पुनर्वन अधिकरी यांनी मागितलेली माहिती पत्रा द्वरे दिलेले आहे.

सातारा व सांगली जिल्हा पुनर्वसन कार्यालयाकडून वरील प्रकल्पातील जवळ जवळ हजार ते बाराशेपेक्षा जास्त खातेदारांचे वरील प्रमाणे पेपर घेवून जमिन वाटपाचे आदेश काढले आहेत व आता जानिव पुर्वक आधिकाऱ्या कढून काही त्रुटी काढून वेळ काढू पणा करत आहेत व प्रकल्प गस्थान त्रास देत आहेत.

गेली २५ वर्ष प्रकल्प गस्त हे शासनाकडुन देय असलेल्या जमिनीपासून वंचीत आहेत. विकसनशील पुनर्वस करुन घेण्यासाठी आमची एक पिढी सातारा, सांगली, पुणे, मुंबई, अधिकाऱ्याकडे हेलपाटे मारत आहे. जमीन व घराची शासनाकडुन नुकसान भरपाईची मिळालेली रक्कम व रोजगार करुन मिळालेल्या पैशाची विल्हेवाट लावून स्वर्गवासी झाले आहे. तरी आमाच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही आता तरी आम्हाला योग्य न्याय मिळणार आहे का? 

विभागीय आयुक्त पुणे जिल्हा आधिकारी सांगली व सातारा यांना आपल्याकडुन आदेश व्हावेत की पुर्वी ज्याप्रमाणे शासन नियमानुसार पेपर घेवून जमीन वाटपाचे आदेश काढण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे पेपर घेवून आदेश व्हावेत. असे आपल्या कडून संबंधीतांना आदेश दयावेत अशी मागणी केली आहे.

सांगली जिल्हा पुनर्वस विभागाकडुन जमिन वाटपाचे १५ दिवासात आदेश झाले. नाहीत तर आम्हाला पुन्हा २६ जानेवारीला मंत्रालया समोर अंदोलन करावे लागेल यांची जबाबदारी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयाची राहील असा इशारा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने