भारतरत्न भारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य प्रवेशद्वार सांची स्तूपचे उद्घाटन
भारतरत्न भारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य प्रवेशद्वार सांची स्तूपचे उद्घाटन
मुंबई / अनिल भंडारे
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या दादर पश्चिम, सेनापती बापट मार्ग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (पूर्वी डबक चाळ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९११ साली वास्तव्यास होते. याच ठिकाणी चैत्यभूमी येथे असलेल्या सांची स्तुपाच्या प्रतिकृतीचे (तोरणा प्रवेशद्वार) स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
आर्टुडू या कंपनीचे महेश उतेकर आणि स्वप्नील शिंदे
यांनी नी ही प्रतिकृती साकारली. या वेळी स्थानिक रहिवासी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब हे या डबक चाळीत वास्तव्यास होते. यामुळे या परिसरास विशेष महत्त्व असल्याने या वारसाभूमीला चैत्यभूमी येथील प्रवेशद्वारची प्रतिकृती असलेल्या सांची स्तुपाप्रमाणे प्रवेशद्वाराचे (तोरणा गेट) प्रेक्षणीय स्थळ म्हणून पालिकेच्या संबंधित विभागाने नोंद घ्यावी, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
जितेंद्र कांबळे, अनिल भंडारे, विलास आढाव,बाळू कांबळे, अशोक भोसले, चंद्रकांत सोरटे, निर्मला कांबळे, आणि नगरातील सर्व रहिवाशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम छान पार पडला.
Comments
Post a Comment