मंत्रालयाच्या समोर करणार रस्ता रोको आंदोलन
मंत्रालयाच्या समोर करणार रस्ता रोको आंदोलन
तुळशीराम सानप यांचा इशारा
मुंबई / रमेश औताडे
पश्चिम वाहिनीचे पाणी मुळा व जायकवाडी धरणाच्या प्रवाहात सोडवून पाथर्डी - शेवगाव तालुक्यातील गावांच्या शेतीसाठी पाणी पाईपलाईन मार्फत द्यावे
तसेच शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप रा. कुत्तरवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अ.नगर यांनी दिनांक ९/१२/२०२४ रोजी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री ,माननीय जलसंपदा मंत्री, माननीय मुख्य सचिव, यांना केली होती.
सानप यांनी दिनांक १/०७/२०२४ रोजी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बैठक आयोजित करणेबाबत निवेदन दिले होते. माजी मुख्यमंत्री महोदय यांनी याबाबत बैठक आयोजित करण्याचे आदेश मा.अप्पर मुख्य सचिव जलसंपदा यांना दिले होते. माजी मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशामुळे वांबोरी पाईपलाईन चारी टप्पा क्रमांक २ तसेच ताजनापूर उपसा सिंचन याबाबतच्या कामकाजास अंतिम मंजुरी देण्यात आलेली असून याबाबत लवकरच कामकाज चालू होणार आहे. दोन्ही तालुक्यातील राहिलेल्या गावांच्या शेतीसाठी पाणी पाईपलाईन मार्फत देणेबाबतचा अहवाल मा. कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ यांनी मा. अप्पर मुख्य सचिव जलसंपदा यांना सादर केलेला आहे .सदर प्रकरणाचा मंत्रालयातील कार्यालयीन
क्रमांक ४८/२०२४ असा आहे.
शेतीसाठी पाणी तसेच पीक कर्जमाफी बाबत सरकारने कार्यवाही केली नाही तर दिनांक ३१/०१/२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता मंत्रालयासमोर मादाम कामा मार्ग येथे २०० कार्यकर्त्यासह सानप हे चक्काजाम रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
Comments
Post a Comment