आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित



बहुजन मुक्ती पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दि ३० जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन नियोजिले होते, तसेच राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या अथक परिश्रमाने मा श्री वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आधिपत्याखाली हे आंदोलन यशस्वी रित्या पार पडले. 

प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी वर्गाने आंदोलनाचे गांभीर्य न घेता शुल्लक कारणे देत जनिपूर्वक अन्याय करण्याचा कट रचला होता असे दिसून आले. परंतु आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी सादर आंदोलनाची दखल घेत संघटनेला वेळ दिला व आंदोलन दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समयसूचकतेने आयुक्त यांच्याकडे धाव घेतली व चर्चे माध्यमातून सदर मागन्यांचा मुद्दा निकाली काढला व तत्काळ नमूद मागण्या बाबत प्रशासकीय अधिकारी यांना प्रस्ताव पाठऊन मान्यता घेउन अशे आश्वासन आयुक्तांनी दिले.

DMER सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत पद वाढ व कमी करण्याचा अधिकार शासनाने राखून ठेवला आहे ज्यामुळे आम्ही ९०० परीसेविका यांची पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या या जागांचा प्रस्ताव शासनास तत्काळ पाठून मान्यता घेऊ.

-आयुक्त (वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुम्बई)

सदर झालेल्या आंदोलन हे सर्व सामान्य बेरोजगार उमेदवारांना न्याय मिळावा करिता नियोजित होते, त्यामुळे मा आयुक्त यांनी संघटनेच्या प्रमुख मागण्यांची दाखल घेत बैठकीस वेळ दिला व तत्काळ कार्यवाही करून आपणास न्याय देऊ असे आश्वासन दिले.
-अभिलाष टेकाडे (RMBKS सदस्य तथा आंदोलन समन्वयक)

पी आर न्यूज नेटवर्क 
महाराष्ट्र राज्य

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"