निवडणूक २०२४ अंदाज स्पर्धेचे गुरुदत्त लाड विजेते
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विधानसभा निवडणूक २०२४ अंदाज स्पर्धेत विजेते ठरलेले गुरुदत्त लाड यांचा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सत्कार केला. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर व पत्रकार उपस्थित होते.
निवडणुका आणि त्याबद्दल असलेला अंदाज याचा प्रदीर्घ अनुभव असलेले लाड ३५ वर्ष महाराष्ट्रातील दैनिकामध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. व्यवस्थापकीय संचालक म्हणून संपूर्ण वर्तमानपत्राची जबाबदारी, संपादकीय वितरण जाहिरात व छपाई या विभागाचा प्रमुख म्हणून वर्तमानपत्राशी निगडित असलेल्या सर्व संस्थाना माहीत असलेले गुरुदत्त लाड हे एक नाव आहे.
१९८७ गावकरी या नाशिक मधील दैनिकापासून त्यांची या क्षेत्रामध्ये सुरुवात झाली. गावकरी दैनिकाचे रसरंग, अमृत, साप्ताहिक गावकरी यामध्ये वेगवेगळ्या विषयावर लेख लिहिण्याच्या सोबत जाहिरात विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक या पदावर पाच वर्ष मुंबईमध्ये काम केले. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच भाषेमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या " कालदर्पण " दिनदर्शिके चे प्रकाशन हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते.
१९९४ मध्ये मुंबई चौफेर या दैनिकाचे मालक प्रकाशक मुरलीधरजी शिंगोटे यांच्यासोबत कालदर्पण दीनदर्शिका वितरणा बाबत संपर्क झाल्यानंतर त्यांच्या विनंतीवरून मुंबई चौफेर, वार्ताहर, यशोभूमी,कर्नाटक मल्ला, दैनिक पुण्यनगरी पहिल्या अंकापासून २२ वर्ष व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. दैनिक सकाळ, जनशक्ती या वर्तमानपत्रात सुद्धा महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते.
Comments
Post a Comment