वारस हक्काच्या लढाईनंतर कामगारांचा मुंबईत भव्य विजयी मेळावा
वारस हक्काच्या लढाईनंतर कामगारांचा मुंबईत भव्य विजयी मेळावा
मुंबई / रमेश औताडे
संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो कामगारांची लाड पागे समितीच्या शिफारशीमुळे न्यायालयाने " वारस हक्क नोकरी " अबाधित ठेवली आहे. याचा आनंद झाल्याने कामगारांचा व न्यायालयात कामगारांची योग्य भूमिका मांडणाऱ्या वकिलांचा भव्य विजयी मेळावा नुकताच मुंबईत पार पडला
कामगारांसाठी सुमारे दीड दोन वर्षे लढणारे महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी फेडरेशनचे कामगार नेते व उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठ समोर प्रभावी व अभ्यासपूर्ण बाजू मांडणारे ज्येष्ठ विधितज्ञ वकील यांचा गौरव यावेळी करण्यात आला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ, भोईवाडा, परळ मुंबईच्या सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अध्यक्ष अशोक जाधव, स्वागताध्यक्ष वामन कविस्कर, प्रस्तावना यशवंतराव देसाई यांनी केली.
विशेष अतिथी वरिष्ठ विधीतज्ञ ॲड. हरीश बळी आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. बळीराम बी. शिंदे, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार व कर्मचारी फेडरेशनचे प्रमुख सरचिटणीस गौतम खरात, सुरेश ठाकूर, अनिल जाधव, संतोष पवार आणि महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर, मनिषा काकड व राज्यातील प्रमुख कामगार नेते तसेच म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबईचे कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई, इंजि. रमेश भुतेकर-देशमुख उपस्थित होते.
अतिथीचे स्वागत म्युनिसिपल मजदूर यूनियन मुंबईचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर, कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई, कोषाध्यक्ष शरद राघव, माजी कामगार अधिकारी सहदेव मोहिते, मारुती विश्वासराव उपस्थित होते.
Comments
Post a Comment