वर्षाला २० करोड रूपयांचा अधिकृत नफा देणारी महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद पडू देणार नाही
वर्षाला २० करोड रूपयांचा अधिकृत नफा देणारी " महाराष्ट्र राज्य लॉटरी " सरकारी अधिकारी बंद करण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने जर लॉटरी बंद केली तर लाखो लॉटरी विक्रेते बेरोजगार होतील. त्यामुळे सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा " महाराष्ट्र राज्य पेपर अँड ऑनलाईन लॉटरी विक्रेता युनियन " चे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी निवेदनाद्वारे सरकारला दिला आहे.
विशेष म्हणजे शासनाचे माहिती अधिकार अधिकारी सं. तु. ओहाळ यांनी २२ एप्रिल २०२४ रोजी माहिती अधिकारात सांगितलेली ही अधिकृत आकडेवारी २०२३ / २०२४ ची आहे. २ कोटी ५२ लाख ४३ हजार ३४२ रुपये हा विक्री मधून झाला आहे. तर १७ कोटी ७२ लाख ४ हजार ८६० हा जी एस ती मधून झाला आहे. असे एकूण १९ कोटी ५९ लाख ६८ हजार २०२ रुपये हा एकूण नफा झाला आहे. मग लॉटरी व्यवसाय तोट्यात कसा ? असा सवाल महाराष्ट्र राज्य पेपर अँड ऑनलाईन लॉटरी विक्रेता युनियन चे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी निवेदनाद्वारे सरकारला विचारला आहे.
अरुणाचल प्रदेश, केरळ, मिझोराम, पंजाब, नागालँड, गोवा, मणिपूर, सिक्कीम, वेस्ट बंगाल, ऑस्ट्रेलिया, यू एस ए सारख्या देशात लॉटरी उद्योग चांगली कमाई करत आहे. मग आपल्याकडे लॉटरी बंद करण्याचे कारस्थान का केले जात आहे. असा सवाल " लॉटरी ट्रेड एजंट असोसिएशन " या व्यापारी ट्रेड युनियन चे अध्यक्ष व श्री इंटरप्राईजेस दादर चे मालक वितरक तसेच " लॉटरी रोजगार निर्माण महाकृती समिती " चे वरिष्ठ पदाधिकारी स्नेहल कुमार शहा यांनी केला आहे.
नशिबाला संधी देणारी ही महाराष्ट्र राज्य लॉटरी आहे. हजारो लोकांना लखपती तर करोडो लोकांना करोडपती बनवणारी आहे. ही लॉटरी सरकारने कुणाच्याही सांगण्यावरून बंद करू नये. लॉटरी विभागाची उदासीनता असल्यामुळे चुकीची माहिती अधिकारी वर्ग देत असल्याने गोंधळ झाला आहे.महत्वाचे म्हणजे २ कोटी रुपयाची तरतूद जाहिरात करण्यासाठी केली असताना ती रक्कम जाहिरात न करता परत केली जाते. यामागचा उलघडा झाला पाहिजे.
१२ एप्रिल १९६९ रोजी गजलक्ष्मी या बोधचिन्ह सह महाराष्ट्र राज्य लॉटरी शुभारंभ केला. बेरोजगार तरुणांना अधिकृत रोजगार मिळाला. अवैध जुगार मटका यांना आळा बसला. अनेक तरुण या व्यवसायात उतरले. हिंदूरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या तरुणाच्या व्यवसायाला वेळोवेळी सहकार्य केले होते. विकास कार्यात लॉटरी च्या नफ्याची रक्कम आत्तापर्यंत वापरली गेली आहे. धरणे, शेती,आरोग्य, शाळा, भूकंप धारकांना मदत केली गेली आहे अजूनही मदत होत असताना हा व्यवसाय बंद करण्याचे षडयंत्र कोणाचे आहे ? असा सवाल उपस्थित होत आहे.
लॉटरी बंद केली तर रोजगार तर जाईलच अनेक कुटुंब देशोधडीला लागतील, महाराष्ट्राचा महसूल कमी होईल. त्यासाठी ही लॉटरी बंद न करता लोकप्रिय बक्षीस योजना आणावी, लॉटरीचे आधुनिकीकरण करून डिजिटल लॉटरी सुरू करावी, उरलेली अनसोल्ड तिकिटे परत घ्यावी. समितीने दिलेले उपाय अंमलात आणावेत.
इतर राज्यात उरलेली तिकिटे परत घेतात. महाराष्ट्रातही उरलेली तिकिटे परत घ्यावीत, पारदर्शकता येण्यासाठी विशेष महानुभवी व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचा सल्ला घ्यावा, विविध जिल्ह्यात सोडतीचे आयोजन करावे व लाईव्ह सोडत करावी.
इतर राज्यातील लॉटरी महाराष्ट्रात विक्री होते. मग आपली लॉटरी इतर राज्यात का विक्री होत नाही. इतर राज्यात महाराष्ट्राची लॉटरी कशी विक्री करायची यासाठी आमच्याकडे प्लान आहेत. ते प्लान सरकारने आम्हाला बोलाऊन समजाऊन घ्यावेत व त्याची अंमलबजावणी करावी असे लॉटरी रोजगार निर्माण महाकृती समिती चे वरिष्ठ पदाधिकारी स्नेहल कुमार शहा यांनी केला आहे.
पी आर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य
संपादक रमेश औताडे
Comments
Post a Comment