...नाहीतर मंत्राल्यासमोर तीव्र आंदोलन करणार
...नाहीतर मंत्राल्यासमोर तीव्र आंदोलन करणार
मुंबई / रमेश औताडे
सरकारने जर लॉटरी व्यवसाय बंद करून गोरगरीब लॉटरी विक्रेत्यांच्या पोटावर पाय दिला तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करून सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा राज्यातील लॉटरी विक्रेत्यांनी दिला आहे.
राज्यातील लॉटरी विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
५५ वर्षाचा इतिहास असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी सरकारी बाबू बंद करण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसपूर्वी लॉटरी छापाई बंद केली आहे.आता पूर्ण व्यवसाय बंद करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आल्याने आम्ही प्रसिद्धी माध्यमातून सरकारला आंदोलनाचा इशारा देत आहे. असे महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता कर्मचारी सेनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी यावेळी सांगितले.
या महाराष्ट्र राज्य पेपर व ऑनलाईन लॉटरी विक्रेता युनियन चे अध्यक्ष चंद्रकांत मोरे म्हणाले की, परराज्यात लॉटरी व्यवसाय करोडो रुपयांचा महसूल देत असताना महाराष्ट्रात लॉटरी व्यवसाय बंद पाडण्याचे कारस्थान का रचले जात आहे ? यामागे सरकारचा काय डाव आहे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आम्ही भेट घेणार आहे. तर स्नेहल शहा म्हणाले, सरकारने जर महाराष्ट्र राज्य लॉटरी ची योग्य प्रकारे जाहिरात केली तर हा व्यवसाय बंद करण्याची गरज पडणार नाही. मात्र सरकार तसे करत नाही.
Comments
Post a Comment