राज्यातील सर्व एस टी स्टँड होणार चकाचक ... बक्षीस रूपाने सरकार करणार ३ कोटी खर्च
राज्यातील सर्व एस टी स्टँड होणार चकाचक
बक्षीस रूपाने सरकार करणार ३ कोटी खर्च
मुंबई / रमेश औताडे
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ( २३ जानेवारी ) पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून " हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान " राबवण्यात येणार आहे.
तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत वाटण्यात येणार असून राज्यात ' अ ' वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे. अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
या अभियानाचा शुभारंभ उद्या (२३ जानेवारी) मंत्री सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नेहरूनगर बस स्थानकावर होणार आहे. यानिमित्ताने सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बसस्थानक तसेच निर्जंतूक , टापटीप प्रसाधनगृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस. टी. महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. या जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे. असे स्पष्ट केले होते.
तसेच " आपलं गाव, आपलं बसस्थानक " या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य " गाभा " राहणार आहे. कोणतेही बसस्थानक हे त्या गावचे मध्यवर्ती ठिकाण असते. त्या अर्थाने बसस्थानक हे त्या गावची " शान " असल्यामुळे गावातील तरुण मंडळे, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह यांनी पुढे येऊन त्या बसस्थानकाच्या सुशोभीकरण आणि सौंदर्यंयीकरणासाठी सरळ हाताने मदत करावी असे मंत्री सरनाईक यांनी आवाहन केले आहे. अशी माहिती महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment