पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची अधिकृत निवड
31 /01 /2025
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची अधिकृत निवड झाली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आणि राज्य शासनाने त्यांना अधिकृत मान्यता दिली आहे. अशी माहिती संस्थेचे राष्ट्रीय सचिव ऍड बी के बर्वे यांनी रिपाई(आठवले) पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव डॉ. वामन आचार्य,सहसचिव डॉ.यु एम. मस्के,कार्यकारी समिती सदस्य चंद्रशेखर कांबळे,विश्वस्त अरविंद, मुंबई युवक अध्यक्ष सचिन मोहिते, सोनटक्के, विशाल गायकवाड उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी दलित, शोषित, पीडित विद्यार्थ्यांसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. या संस्थेअंतर्गत मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बैंगलोर, बिहार येथील ४३ शाळा, महाविद्यालये आणि वसतीगृहे कार्यरत आहेत.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आनंदराज आंबेडकर हे संस्थेचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रामदास आठवले हेच संस्थेचे कायदेशीर अध्यक्ष असल्याचा निर्णय कायम राहिला आहे असे डॉ. वामन आचार्य यांनी यावेळी सांगितले.
पी आर न्यूज नेटवर्क
संपादक रमेश औताडे
Comments
Post a Comment