धार्मिक सोहळ्यात व्ही.व्ही.आय.पी संस्कृती कशासाठी रजनीकांत बोरेले यांचा सवाल





प्रयागराज पांढरकवडा येथील व्हिसल ब्लोअर आणि सामाजिक कार्यकर्ता रजनीकांत डालूरामजी बोरेले यांनी सांगितले की, महाकुंभ मध्ये झालेल्या घटनेत महिला आणि मुलांचे मृत्यु झाले आहेत. फार मोठी दुःखत घटना झाली असून  प्रशाशनाच्या निष्काळजी पनामुळे आणि वी. वी. आय. पी. यांच्या सेवेत आणि त्यांची चाटेगीरी मुळे जगातील सर्वात मोठ्या धार्मिक महाकुंभ मेला याला कलंक लागला आहे.


या घटनेत  20 भाविकांचा मृत्यु झाला आहे. मृत्युची  संख्या वाढत असून प्रशासन मृत्यु ची संख्या कमी दाखवत आहे. कुंभमेला प्रशाशन प्रमुख यांच्या वर गुन्हा दाखल करुण लोकसेवेतुन बरखास्त करण्यात यावे आणि मृत  कुटुंब यांना प्रत्येकी एक एक कोटी रूपयाची आर्थिक नुकसान पोटी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

कोणत्याही व्ही व्ही आय. पी. यांनी स्वतः विवेकशील बुद्धिने निर्णय घेत महाकुंभ मध्ये स्नान करीता येवू नये. त्यांच्या मुळे अनेक ठिकांचे रस्ते बंद करण्यात आले आहे. पी पी पुल विशेष करुण महाकुंभ मध्ये जगभरातून येणाऱ्या श्रद्धालु यांच्या साठी केले होते तो  पुल बंद करण्यात आला होता. त्या शिवाय अनेक घाट  राखीव ठेवण्यात आले आहे.

व्ही व्ही आय. पी. यांच्या महाकुंभ फेरी मुळे कोटयावधी श्रध्दालु यांना नाहक त्रास भोगावे लागले आहे.11 - 11- तास वाहतुकी जाम होत आहे. त्यामुळे व्हीं व्हि आय. पी. यांनी येवू नये. या पुढे महाकुंभ मध्ये  श्रद्धालु यांना नाहक त्रास सोसावे लागले तर काळा वस्त्र घालून प्रयागराज येथील महाकुंभ च्या आरोही घाट वर निषेध करणार असल्याचे रजनीकांत बोरेले यांनी विशेष बातमी पत्राच्या माध्यमातून केले आहे .
           
     

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"