राज्यातील शिक्षकांचे आंदोलन स्थगित



राज्यातील १००  पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंशकाली अथिती कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक निदेशकांना नियुक्ती मिळावी या प्रमुख मागणीसाठी २० जानेवारी पासून कला, क्रीडा व कार्यानुभव कृती समितीचे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू होते. राज्य शिक्षण सचिवांच्या मध्यस्थीने समाधानकारक तोडगा निघाल्याने राज्यातील शिक्षकांचे  आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष दीपक पवार यांनी दिली.

शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट मागितली होती. परंतु शिक्षण मंत्री मागच्या काही दिवसांपासून मंत्रालयात उपस्थित नाही तसेच पुढील काही दिवस देखील उपस्थित राहणार नाही अशी माहिती मिळाली त्यामुळे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शिक्षण उपसचिव तुषार महाजन यांची भेट देण्यात आली. 

शिष्टमंडळामध्ये कृती समितीचे अध्यक्ष दीपक पवार, कल्पना गरुड, पुष्पा राहागंडाले, प्रिया बीसेन,निलेश हिरवे महेश कुलकर्णी, भागवत शिंदे, नंदकुमार रायते, रविशंकर शरणागत आधी उपस्थित होते.

१०० पेक्षा कमी पट असलेल्या निदेशकांना व विस्थापितांना त्वरित नियुक्ती द्यावी, सर्वांना नियुक्ती मिळाल्यानंतर ती कायम करावी अशी मागणी केली.      
महाजन यांनी १४ ऑक्टोबरच्या पत्रानुसार न्यायालयात न गेलेल्या निदेशकांना नियुक्ती मिळत असल्याचे सांगितले.‌ परंतु केवळ १०० पट असलेल्या निदेशकांना नियुक्ती मिळत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. 

तसेच ज्या ७०० याचिकाकर्त्यांना लवकर नियुक्ती मिळाली नाही त्याचे कारण म्हणजे त्यांच्या शाळेचा पट आज १०० नाही. ही बाब सचिवांच्या निदर्शनास आणून दिली. १०० पेक्षा कमी पट झाला परंतु याचिकाकर्ता असल्याने जर त्यांना नियुक्ती मिळत असेल तर १०० पेक्षा कमी पट असलेल्या व न्यायालयात न गेलेल्या  निदेशकांवर अन्याय होत नाही का ? हा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

ज्या शाळांची संख्या ८०, ८५, ९०, ९५, ९८ आहे अशा शाळेतील विद्यार्थ्यांना कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षण मिळत नाही व तेथे निदेशक नियुक्त केले जात नाही ही बाब देखील निदर्शनास आणून दिली असता बोलताना त्यांनी सांगितले की, पटसंख्या थोडीफार कमी असेल तर त्यासाठी काही तरतूद करता येईल.
दोन-तीन शाळा एकत्र करण्यासंदर्भात निवेदनावर इंडॉसमेंट करून शिक्षण आयुक्त यांच्या समितीकडे पाठवण्यासाठी धुमाळ  यांना सांगितले. त्यामुळे कमीपट असलेल्या निदेशकांना नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पी आर न्यूज 
रमेश औताडे 
  संपादक

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"