शेती संशोधन शेतकऱ्यांपर्यंत त्याच्याच भाषेत पोहचायला हवे - पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी

     शेती संशोधन शेतकऱ्यांपर्यंत त्याच्याच भाषेत पोहचायला हवे -                          पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी 

मुंबई / रमेश औताडे 

जगात शेती विषयक कितीही क्रांती झाली किंव्हा नवीन संशोधन तंत्रज्ञान आले तरी, जोपर्यंत ते शेतकऱ्यांना कळेल अशा भाषेत त्याला मिळाले नाही तरच शेतकरी समृध्द होईल व शेतकरी आत्महत्या कमी होतील. असे मत पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी यांनी मुंबईत  महाराष्ट्र राज्य अंबा उत्पादक संघ  परिषद कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केले.

शेतकरी आत्महत्या होऊ नयेत व शेतकरी समृध्द व्हावा यासाठी " महाराष्ट्र राज्य अंबा उत्पादक संघ " यांच्यावतीने मुंबईत कृषी फलोत्पादन, सेंद्रिय, सिंचन, पणन , इन्शुरन्स, फूड परिषद व सिद्धेश्वर ॲग्रोटेक प्रदर्शन  याचे आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी बोलताना पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी 
म्हणाले,  मी सातारा जिह्यातील खेडेगावातील आहे. लहानपण माझं गावाला गेले. आम्ही मुंबईला आलो तेव्हा कळलं पायात चप्पल घालतात आणि आम्ही गरीब आहोत याची जाणीव आम्हास तेव्हा झाली. 

यावेळी " महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे "  अध्यक्ष चंद्रकांत मोकल,  प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण प्राध्यापक जे बी जोशी , कुलपती रासायनिक तंत्रज्ञान संस्था अभिमत विद्यापीठ मुंबई अंजनी कुमार श्रीवास्तवा जनरल मॅनेजर SIDBI गव्हर्मेंट ऑफ इंडिया  हे उपस्थित होते.

या परिषदेस देशभरातून शेतकरी, शेती विषयक व्यापारी, उत्पादक उपस्थित होते. शेती विषयक गौरवस्पद काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा स्मृती चिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना चंद्रकांत मोकल म्हणाले. जागतिक हवामान बदलामुळे म्हणजे ग्लोबल वार्मिंग मुळे अवकाळी पाऊस तापमान वृद्धी थंडीचा असमतोलपणा गारपीट व वादळासारखी संकटे येत आहेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी त्यावर उपाय शोधण्यासाठी " महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ" विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून, मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. 
 
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने तज्ञ आणि शेतकरी यांची सांगड घालून शेतकऱ्यांच्या प्रबोधनाचे जे कार्य चालवले आहे त्या मुळे मला चांगले भविष्य दिसत आहे. असे समन्वयाने काम केल्यास शेतकऱ्यांचे दिवस चांगले येतील असे ते म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"